Coronavirus | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

पुण्यात (Pune) गेल्या 24 तासांत 285 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून 8 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पुण्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 7750 वर पोहोचली आहे. तसेच आज 152 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत पुण्यात 4502 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यासंदर्भात पुण्याच्या आरोग्य विभागाने (Pune Health Department) माहिती दिली आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात (Maharashtra) आज 2487 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. तसेच 89 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 67,655 वर पोहोचली आहे. याशिवाय मुंबईत (Mumbai) आज 1 हजार 244 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 52 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे कोरोनाबाधितांची संख्या 39 हजार 464 वर पोहचली आहे. आतापर्यंत 1 हजार 279 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. (वाचा - Coronavirus Cases In Maharashtra: महाराष्ट्रात आज 2487 नवे कोरोना रुग्ण, तर 89 जणांचा मृत्यू; राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 67655 वर पोहोचली)

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशात आतापर्यंत पाच वेळा लॉकडाऊन घोषीत करण्यात आले आहे. दरम्यान, मिशनबिगिनअगेन या अभियानांतर्गत राज्य शासनाने टप्प्या टप्प्याने लॉकडाऊनमधील निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची सुरुवात 3 जून, 5 जून आणि 8 जून अशा तीन टप्प्यात केली जाणार आहे. यामुळे महाराष्ट्राच्या अर्थचक्राला पुन्हा गती मिळणार आहे. काही निर्बंधासह रिक्शा, ऑटो, स्कूटर या वाहनांना परवानगी देण्यात आली असून, दुकानेसुद्धा निर्धारित केलेल्या नियमानुसार व वेळेत सुरु राहतील. हा आदेश 1 जून पासून अंमलात येत असून तो 30 जून 2020 पर्यंत लागू राहणार आहे.