Coronavirus In Maharashtra | (Photo credit: archived, edited, symbolic images)

Coronavirus Cases In Maharashtra: महाराष्ट्रात (Maharashtra) आज 2487 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. तसेच 89 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 67,655 वर पोहोचली आहे. यासंदर्भात आरोग्य विभागाने (State Health Department) माहिती दिली आहे.

याशिवाय आज 1248 जणांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच राज्यात आतापर्यंत 29,329 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरत आहे. (हेही वाचा - Coronavrius In Dharavi: धारावीतील कोरोनाग्रस्तांची संख्या 1771 वर पोहोचली; आज 38 नव्या कोरोना रुग्णांची भर)

राज्यात सर्वाधिक कोरोना रुग्णांची संख्या मुंबई-पुणे शहरात आढळून येत आहे. आज मुंबईतील धारावीमध्ये 38 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे धारावीतील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 1771 वर पोहोचली आहे.

भारतात गेल्या 24 तासांत 8380 नवे रुग्ण आढळले असून कोरोना संक्रमितांचा एकूण आकडा 1,82,143 वर पोहोचला आहे. आतापर्यंत भारतात 5164 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. सध्या देशात 89,995 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. यातील 86,984 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.