Coronavrius In Dharavi: धारावीत (Dharavi) आज 38 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली असून कोरोनाग्रस्तांची संख्या 1771 वर पोहोचली आहे. तसेच आतापर्यंत धारावीत 71 रुग्णांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. यासंदर्भात मुंबई महानगरपालिकेने (Brihanmumbai Municipal Corporation) माहिती दिली आहे. धारावीत कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे याठिकाणी राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वाचावरण पसरत आहे.
दरम्यान, रविवारी महाराष्ट्रात 2940 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. तसेच 99 जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 65,168 वर पोहोचला असून एकूण 2197 जणांचा मृत्यू झाला आहे. याबाबत आरोग्य विभागाकडून माहिती देण्यात आली आहे. (हेही वाचा - भारतात कोरोनाचा हाहाकार! 8380 नव्या COVID-19 रुग्णांसह देशात कोरोना संक्रमितांची एकूण संख्या 1,82,143 वर)
38 new #COVID19 positive cases reported today in Dharavi area of Mumbai, taking the total number of positive cases to 1771. Death toll stands at 71: Brihanmumbai Municipal Corporation (BMC) #Maharashtra pic.twitter.com/4zCsxK6ZMe
— ANI (@ANI) May 31, 2020
याशिवाय, भारतात गेल्या 24 तासांत 8380 नवे रुग्ण आढळले असून कोरोना संक्रमितांचा एकूण आकडा 1,82,143 वर पोहोचला आहे. आतापर्यंत भारतात 5164 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. सध्या देशात 89,995 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच यातील 86,984 रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.