Coronavirus Update (Photo Credit: Twitter)

भारतात कोरोना व्हायरस (Coronavirus) ने अक्षरश: धुमाकूळ घातला असून देशात कोरोना बाधितांच्या संख्येत दिवसागणिक वाढच होत चालली आहे. गेल्या 24 तासांत 8380 नवे रुग्ण आढळले असून कोरोना संक्रमितांची एकूण संख्या 1,82,143 वर पोहोचली आहे. तसेच काल दिवसभरात 193 रुग्ण दगावले असून मृतांचा एकूण आकडा 5164 वर पोहोचला आहे. सद्य घडीला देशात 89,995 रुग्णांवर उपचार सुरु असल्याचे आरोग्य मंत्रालयाने (Health Ministry of India) सांगितले आहे.तसेच यातील 86,984 रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले असल्याचे आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.

भारतात सर्वाधिक कोरोना रुग्ण महाराष्ट्रात असून येथील रुग्ण संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. सद्य घडीला महाराष्ट्रात 65,168 रुग्ण आहेत. त्यापाठोपाठ तामिळनाडू, नवी दिल्ली, गुजरात मध्ये सर्वाधिक कोरोना रुग्ण आहेत. यात तमिळनाडूत 21,184, नवी दिल्ली 18,549, गुजरातमध्ये 16,343 रुग्ण आहेत. Unlock 1: तीसऱ्या टप्प्यातील आंतरराष्ट्रीय उड्डाणे, मेट्रो रेल, सिनेमा हॉल, जिम, जलतरण तलाव सुरू करण्यासंदर्भात सरकार निर्णय घेणार

दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने देशात 31 मेपर्यंत लॉकडाउन कायम ठेवण्यात आला आहे. मात्र, यावेळी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून देशातील कंटेन्मेंट झोनमध्ये लॉकडाऊन 30 जूनपर्यंत वाढवण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयांकडून याचे दिशानिर्देश जारी करण्यात आले आहे. या लॉकडाऊनमध्ये अनेक नियम शिथील करण्यात आले आहेत.

कोरोनाचे संकट पाहता पाचव्या लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. या काळात मेट्रो, सिनेमागृह बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच राजकीय, समाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे.