Unlock 1: तीसऱ्या टप्प्यातील आंतरराष्ट्रीय उड्डाणे, मेट्रो रेल, सिनेमा हॉल, जिम, जलतरण तलाव सुरू करण्यासंदर्भात सरकार निर्णय घेणार
Flight (Photo Credits: Pixabay)

Unlock 1:  केंद्र सरकाराने आज लॉकडाउन 5.0 (Lockdown 5.0 ) संदर्भात घोषणा केली आहे. या घोषणेनुसार, कटेन्मेंट झोनमधील लॉकडाऊनमध्ये 30 जूनपर्यंत वाढ करण्यात आली आहे. लॉकडाऊन 5.0 मध्ये तीन टप्प्यांमध्ये कामे सुरू करण्यात येणार आहेत. आंतरराष्ट्रीय उड्डाणे, मेट्रो रेल, सिनेमा हॉल, जिम, जलतरण तलाव सुरू करण्यासंदर्भातील तारखांविषयी सरकार निर्णय घेणार आहे. कोरोना प्रादुर्भाव लक्षात घेत परिस्थितीचे आकलन करून यासंदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे.

यातील पहिला टप्प्यात 8 जूनपासून धार्मिक स्थळे, हॉटेल, रेस्टॉरंट्स, शॉपिंग मॉल्स उघडण्यास परवानगी देण्यात येणार आहे. तर दुसरा टप्प्यात शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक / प्रशिक्षण / प्रशिक्षण संस्था इ. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या सल्लामसलतानंतर उघडण्यात येणार आहे. (हेही वाचा - Unlock 1 Guidelines: कटेन्मेंट झोनमधील लॉकडाऊनमध्ये 30 जूनपर्यंत वाढ; केंद्र सरकारकडून कंन्टेंटमेंट झोन वगळता कोणती कामे सुरु होणार यासंदर्भात नवीन मार्गदर्शक सुचना जारी)

याशिवाय तिसरा टप्प्यात आंतरराष्ट्रीय हवाई प्रवास सुरू करण्याच्या तारखा, मेट्रो रेल्वेचे काम, सिनेमा हॉल, व्यायामशाळा, जलतरण तलाव, करमणूक उद्याने इत्यादी संदर्भात आकलनाच्या आधारे निर्णय घेण्यात येणार आहे. दरम्यान, 8 जूनपासून धार्मिक स्थळे, मॉल्स, हॉटेल्स सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, संबंधित ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे अनिवार्य असणार आहे.