Gyms And Fitness Centres Allowed To Reopen In Maharashtra: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात अनलॉक अंतर्गत बऱ्याच गोष्टी टप्प्याटप्प्याने सुरु केल्या जात आहे. मात्र, गेल्या सात महिन्यांपासून राज्यातील व्यायामशाळा आणि फिटनेस सेंटर बंद होते. यामुळे मागच्या महिन्याभरापासून राज्यामध्ये जिम, व्यायामशाळा सुरु करण्याची मागणी जोर धरला होता. राज्य सरकारने आज अखेर ही मागणी मान्य केली असून राज्यात येत्या 25 ऑक्टोबरपासून व्यायामशाळा आणि फिटनेस सेंटर उघडण्याची परवानगी दिली आहे. तसेच कोरोनाच्या वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपायोजना आणि नियमांचे काटेकोरपणे पालन करुन, राज्यात जिम, फिटनेस सेंटर, व्यायामशाळा सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देशात 24 मार्चला लॉकडाऊन घोषीत करण्यात आला आहे. परिणामी, व्यवसाय, उद्योगधंदे आणि वाहतूकीसह अनेक गोष्टी बंद होत्या. मात्र, अनलॉक अंर्तगत टप्प्याटप्याने बऱ्याच गोष्टी सुरु करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील व्यायामशाळा सुरु करण्यात यावी, अशी मागणी केली जात होती. तसेच जिम, व्यायामशाळांना परवागनी मिळावी, यासाठी या संघटनेच्या प्रतिनिधींनी कृष्णकुंजवर जाऊन राज ठाकरेंची सुद्धा भेट घेतली होती. मात्र, उद्धव ठाकरे यांनी आज जिम, फिटनेस सेंटर आणि व्यायाम शाळेंच्या प्रतिनिधींशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला आहे. दरम्यान त्यांनी राज्यातील व्यायामशाळा उघडण्यास परवानगी देत असतानाच एसओपीचे काटेकोरपण पालन करण्याचे उद्धव ठाकरे यांनी निर्देश दिले आहेत. हे देखील वाचा- Uddhav Thackeray Solapur Tour: अतिवृष्टीग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 19 ऑक्टोबरला सोलापूर दौऱ्यावर; येथे पाहा संपूर्ण वेळापत्रक
ट्विट-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिम,फिटनेस सेंटर्स व व्यायामशाळांच्या प्रतिनिधींशी साधला ई-संवाद. कोरोना प्रतिबंधात्मक नियम-उपायांचे (#SOP) काटेकोर पालन करत जिम, फिटनेस सेंटर्स व व्यायामशाळा दसऱ्यापासून सुरु करण्यास मान्यता. स्टिम बाथ, सौना, शॉवर आणि झुंबा, योगा पूर्णपणे बंद राहणार pic.twitter.com/9fZy17sYBp
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) October 17, 2020
महाराष्ट्रात आज आणखी 10 हजार 259 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर, 250 जणांचा मृत्यू झाला आहे. ज्यामुळे महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा 15 लाख 86 हजार 321 वर पोहचला आहे. यापैकी 41 हजार 965 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 13 लाख 58 हजार 606 जणांनी कोरोनावर मात केली आहे.