Uddhav Thackeray Solapur Tour: अतिवृष्टीग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 19 ऑक्टोबरला सोलापूर दौऱ्यावर; येथे पाहा संपूर्ण वेळापत्रक
Chief Minister Uddhav Thackeray (PC - Twitter)

महाराष्ट्रात (Maharashtra) परतीच्या पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्यात ठिकठिकाणी अतिवृष्टी आणि वादळी पाऊस कोसळल्याने कापूस, ऊस, तांदूळ, सोयबीनची पीके हातातोंडाशी आली असताना वाहून गेली आहे. एवढेच नव्हेतर, अनेकांनी या पावसात आपला जीव गमवाला आहे. या पूरपरिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून शेतकरी, ग्रामस्थ यांना भेटण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे सोमवार 19 रोजी सोलापूर दौरा (Solapur Tour) करणार आहेत. दरम्यान, ते सांगवी, अक्कलकोट येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे यांचा हा एक दिवसाचा प्रवास असणार आहे. उद्धव ठाकरे हे विमानाने सोलापूरला जाणार आहेत. त्यानंतर तिथून ते गाडीने सांगवी आणि अक्कलकोटला जाणार आहेत. कोरोनाच्या संकट काळातील उद्धव ठाकरे यांचा हा पहिलाच दौरा असणार आहे. याआधी त्यांनी अनेकदा ऑनलाईन पद्धतीने राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला आहे. हे देखील वाचा- Jalgaon Massacre Case: जळगाव हत्याकांड प्रकरणातील पीडित कुटुंबीयांची गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घेतली भेट

मुख्यमंत्र्यांचे कार्यक्रम पुढीलप्रमाणे- 

सकाळी 09:00 वा.सोलापूर विमानतळ येथे आगमन व मोटारने शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण

सकाळी 09:30 वा.सोलापूर येथून मोटारने सांगवी खूर्द ता. अक्कलकोट, जि. सोलापूरकडे प्रयाण (अक्कलकोट मार्गे)

सकाळी 10:45 वा. सांगवी खूर्द येथे आगमन व नैसर्गिक आपत्तीमुळे पडझड झालेल्या घरांची पाहणी व ग्रामस्थांशी चर्चा

सकाळी 11:00 वा. सांगवी पूलाकडे प्रयाण व बोरी नदीची व पूरग्रस्त भागाची पाहणी

सकाळी 11:15 वा. अक्कलकोट शहरकडे प्रयाण

सकाळी 11:30 वा. अक्कलकोट शहर येथे आगमन व हत्ती तलावाची पाहणी

सकाळी 11:45 वा. अक्कलकोट येथून रामपूकडे प्रयाण

दुपारी 12:00 वा. रामपूर येथे आगमन व अतिवृष्टीमुळे पडझड झालेल्या घरांची व शेतीपीकांच्या नुकसानीची पाहणी

दुपारी 12:15 वा.रामपूर येथून बोरी उमरगे ता. अक्कलकोटकडे प्रयाण

दुपारी 12:30 वा.बोरी उमरगे येथे आगमन आपत्तीग्रस्त घरांची व शेतीपीकांच्या नुकसानीची पाहणी

दुपारी 12:45 वा.बोरी उमरगे ता. अक्कलकोट येथून सोलापूरकडे प्रयाण

दुपारी 03:00 वा. पूरपरिस्थितीबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा, व अभ्यागताच्या भेटी व नंतर सोलापूर विमानतळ येथे आगमन व मुंबईकडे प्रयाण

महाराष्ट्राचे मुंख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील अतिवृष्टी झालेल्या भागाचा प्रत्यक्ष दौरा करावा, त्याने लोकांना मोठा दिलासा मिळेल, असा सल्ला वंचित बहुजन आघाडी नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिला होता.