Jalgaon Massacre Case: जळगाव हत्याकांड प्रकरणातील पीडित कुटुंबीयांची गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घेतली भेट
Jalgaon Massacre Case (Photo Credit: Twitter)

जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील बोरखेडा गावात काल चार अल्पवयीन भावंडांची हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. यानंतर संपूर्ण महाराष्ट्राला हादरून सोडले आहे. याप्रकरणातील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा कण्यासाठी खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावे, अशी मागणी पीडतांच्या नातेवाईक करत आहेत. यातच महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी याप्रकरणातील पीडित कुटुंबियांची भेट घेतली आहे. तसेच या प्रकरणात जलदगतीने कारवाई करण्याची सुचना स्थानिक पोलीस प्रशासनाला दिली आहे.

जळगाव जिल्ह्यातील बोरखेडा (ता.रावेर) येथील पीडित कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी राज्य शासन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचा विश्वास त्यांना दिला. सदर हत्याकांडातील संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून पोलीस योग्य दिशेने तपास करत आहेत, असे अनिल देशमुख म्हणाले आहेत. तसेच पीडित कुटुंबीयांना लवकरात लवकर न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. तसेच या प्रकरणाची जबाबदारी विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांच्या कडे सुपूर्द करण्यात येणार आहे. या प्रकरणात जलदगतीने कारवाई करण्याची सुचना स्थानिक पोलीस प्रशासनाला दिली आहे, असेही ते म्हणाले आहेत. हे देखील वाचा- Shiv Sena Dasara Melava 2020: दसरा मेळाव्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे भाषण व्यासपीठावरुनच होणार; शिवसेना खासदार संजय राऊत यांची माहिती

अनिल देशमुख यांचे ट्विट-

जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील बोरखेडा येथे एका 13 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आला होता. या प्रकाराची वाच्यता होऊ नये म्हणून तिच्यासह चारही भावंडांची कुऱ्हाडीने वार करत अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पीडितेच्या मोठ्या भावाच्या चार मित्रांना अटक केली आहे. पीडतेचे आई-वडिल आणि मोठा भाऊ बाहेरगावी गेले होते. बाहेर गावी जाताना त्यांनी चारही नराधमांना घराकडे लक्ष ठेवण्यास सांगितले होते. मात्र, याचा गैरफायदा घेत त्यांनी क्रूर कृत्य केल्याने संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे.