Shiv Sena Dasara Melava 2020: दसरा मेळाव्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे भाषण व्यासपीठावरुनच होणार; शिवसेना खासदार संजय राऊत यांची माहिती
Sanjay Raut | (Photo Credits: ANI)

महाराष्ट्रासह (Maharashtra) संपूर्ण देशात कोरोनाने थैमान घातले आहे. दरम्यान, खबरदारी म्हणून राज्यातील अनेक धार्मिक, सास्कृतिक, समाजिक कार्यक्रम रद्द किंवा लॉकडॉऊनच्या निर्बंधाखाली साजरा करण्यात येत आहेत. त्यामुळे शिवसेनेचा दसरा मेळावा (Shiv Sena Dasara Melava) नेहमीप्रमाणे साजरा करणार की यावेळी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) ऑनलाइन संवाद साधतील अशी चर्चा सुरु आहे. यासंदर्भात शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) महत्वाची माहिती दिली आहे. यावर्षी दसरा मेळाव्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे व्यासपीठावरुनच भाषण करणार, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

कोरोनामुळे शिवसेनेचा दसरा मेळाला यावर्षी ऑनलाइन पध्दतीने सुरू ठेवण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. याविषयी वृत्तवाहिनीशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असले तरी ते शिवसेना पक्षाचे प्रमुख आहेत. त्यामुळे दसरा मेळाव्याला त्यांचे भाषण व्यासपीठावरुनच होईल, अशी सकारात्मक चर्चा सुरु असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली आहे. तसेच शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावा ऑनलाईन पद्धतीने होईल असे कोणी सांगितले आहे, असा प्रश्नही त्यावेळी त्यांनी उपस्थित केला आहे. दसरा मेळावा हा शिवसेनेची परंपरा आहे. त्याचे सांस्कृतिक आणि राजकीयदृष्ट्या महत्व आहे. तसेच गेल्या अनेक वर्षानतंर शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला आहे. यामुळे याबाबत येत्या एक दोन दिवसात निर्णय घेतला जणार असून सरकारने आखलेल्या नियमांचे उल्लंघन होणार नाही, याचीही काळजी घेतली जाईल. हे देखील वाचा- Raosaheb Danve criticizes Uddhav Thackeray: 'राजा घराच्या बाहेर आला पाहिजे, प्रजेत सामील झाला पाहिजे' मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर भाजप नेते रावसाहेब दानवे यांची टीका

महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 15 लाख 76 हजार 062 वर पोहचली आहे. यापैकी 41 हजार 502 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 13 लाख 44 हजार 368 जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या 1 लाख 89 हजार 715 जणांवर उपचार सुरु आहेत.