Raosaheb Danve and Uddhav Thackeray (Photo Credit: PTI)

महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) सत्तास्थापनेपासून विरोधी पक्ष असलेला भाजप सतत नेतृत्त्वावर टीका करत आहे. नेतृत्त्व सक्षम नसून कामाचा अनुभव नाही इथपासून ते मुख्यमंत्री घरी बसून राज्याचा गाडा हाकतात असा आरोप विरोधीपक्षातील अनेक नेते करत आहेत. यातच भाजप नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची ऐकमेकांशी तुलना करत महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर टीका केली आहे. राजा घराच्या बाहेर आला पाहिजे, प्रजेत सामील झाला पाहिजे, असे दानवे म्हणाले आहेत. तसेच घराबाहेर पडल्यावर एकट्या मुख्यमंत्र्यांनाच कोरोना होतो का? असा सवालदेखील त्यांनी उपस्थित केला आहे.

दवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री असून राज्यातील अनेक जिल्ह्यात जाऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेत आहेत. परंतु, आताचे किती ठिकाणी जाऊन आले आहेत. मी लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, सातारा, ग्रामीण, शहर सगळीकडे फिरलो आहे. मुख्यमंत्र्यांनी घराबाहेर पडले पाहिजे. तुम्हाला एकट्याच खातो की काय कोरोना? असा प्रश्न दानवे यांनी विचारला आहे. तसेच राजा घराच्या बाहेर आला पाहिजे, लोकांमध्ये गेला पाहिजे, प्रजेत सामिल झाला पाहिजे. जनतेचे दुख काय ते समजून घेतले पाहिजे. हे आपले माझे कुटूंब माझी जबाबदारी आहे. हे सरकारची स्थिती अमर अकबर अँथनीसारखी आहे. हे सरकार आहे का? सरकार कोण चालवत आहे, निर्णय कोण घेत आहे? हे काहीच कळत नाही, असेही दानवे म्हणाले आहेत. हे देखील वाचा- Flood in Maharashtra: अतिवृष्टी मुळे नुकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या पाठीशी राज्य सरकारसोबत केंद्रानेही उभं रहावं; महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची केंद्र सरकारकडे भरीव मदतीची मागणी

राज्यात लॉकडॉऊनमुळे बऱ्याच गोष्टी अद्यापही बंदच असल्यामुळे राज्य सरकारला आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. याआधी सुशांत सिंह मृत्यू प्रकरणावरूनही ठाकरे सरकारला धारेवर धरले गेले. एवढेच नव्हेतर, बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत आणि अमृता फडणवीस यांच्यासारख्या विरोधकांकडूनही थेट उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले जात आहे.