Coronavirus (Photo Credit: Twitter)

Coronavirus In Maharashtra: महाराष्ट्रात काल च्या दिवसभरात 5318 नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात 67 हजार 600 रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत. यानुसार सध्या राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा हा 1 लाख 59 हजार 133 इतका आहे. कालच्या दिवसभरात 4430 रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आजवरची एकूण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या 84 हजार 245 आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 52.94 टक्के एवढे आहे. तर आजवरच्या 7  हजाराहून अधिक मृत्यूंसाहित राज्यातील मृत्यूदर 4.57 टक्के एवढा आहे. याबाबत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली आहे. मुंबई- पुणे सह आता कल्याण डोंबिवली, ठाणे, कोकण या भागात सुद्धा कोरोना रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. महाराष्ट्रातले सर्व जिल्ह्यात कोरोनाचे बाधित, मृत आणि बरे झालेले नेमके किती रुग्ण आहेत हे जाणून घेण्यासाठी खाली दिलेला तक्ता तपासून पहा.कोरोनाचे देशभरातील अपडेट्स एका क्लिक वर जाणुन घेण्यासाठी इथे क्लिक करा.

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची जिल्हानिहाय आकडेवारी

जिल्हा संक्रमित रुग्ण मृत्यू बरे झालेले रुग्ण
मुंबई 74,252  4,284 42,329
ठाणे 32,735 819 13,802
पुणे 19,761 694 10,335
पालघर 4880 101 1508 
औरंगाबाद 4586 227 2167
नाशिक 3703 209 2007
रायगड 3518 95 1893
जळगाव 2899 214 1733
नागपुर 1400 14 1021
अकोला 1375 73 863
सातारा 946 43 701
सोलापुर 2536 242 1423
कोल्हापुर 809 10 710
रत्नागिरी 545 25 419
धुळे 935 54 399
अमरावती 506 24 368
जालना 470 13 313
सांगली 332 10 200
नांदेड 318 13 232
अहमदनगर 338 14 241
हिंगोली 262 1 232
यवतमाळ 279 9 186
लातुर 275 17 183
उस्मानाबाद 195 9 150
सिंधुदुर्ग 193 4 150
बुलडाणा 204 12 136
गोंदिया 105 1 102
बीड 109 3 75
परभणी 91 4 75
नंदुरबार 165 7 60
भंडारा 79 0 58
वाशिम 98 3 61
गडचिरोली 63 1 51
चंद्रपुर 73 0 52
वर्धा 16 1 11
अन्य जिल्हे 72 23 0
एकुण 1,59,133 7,106 79,815

दरम्यान, राज्यात आजपर्यंत 8 लाख 96 हजार 874 कोरोना चाचण्या झाल्या आहेत, यापैकी 1,59,133 चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. हे प्रमाण अवघे 17 टक्के असल्याने परिस्थिती अजूनही हातात असल्याचा विश्वास सरकारी व वैद्यकीय यंत्रणांकडून व्यक्त करण्यात येतोय.

देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येने काल 5 लाखाचा टप्पा ओलांडला होता. देशात आज घडीला सुद्धा महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाबाधित आहेत.