Pune: हॉटेलमधील बिलाच्या वादावरुन तरुणाच्या डोक्यात कोयत्याने वार करून केली निर्घृण ह्त्या
Image used for represenational purpose (File Photo)

आजच्या कलियुगात कधी कोणाचे डोके फिरेल काही सांगता येत नाही. पुण्यात (Pune) हॉटेलच्या बिलावरुन झालेल्या शुल्लक वादातून एका माथेफिरूने आपल्या साथीदारांसह एका तरुणाची गळा चिरून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना पिंपरी-चिंचवड (Pimpri Chinchwad) परिसरात घडली. हितेश मुलचंदानी असे या मृत तरुणाचे नाव असून तो 23 वर्षांचा होता. याप्रकरणी 4 संशयितांना अटक करण्यात आली आहे.

महाराष्ट्र टाईम्स ने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी पहाटे पिंपरी-चिंचवड महापालिका इमारतीच्या मागील बाजूच्या रस्त्यावर ही घटना घडली. हितेशच्या मित्रांचे कासारवाडी येथील शीतल हॉटेलमध्ये बिलावरून वाद झाले. या किरकोळ वादाचे रूपांतर भांडणात झाले. हॉटेलमध्ये भांडण सुरू असल्याबाबत हितेश याला त्याच्या मित्राचा फोन आला. हितेशने त्याच्या काही मित्रांसोबत शीतल हॉटेल गाठले.

हेही वाचा- मुंबई: फेसबुकवरील बॉयफ्रेंडने फिल्मी स्टाईलने तरुणीच्या भांगेत भरले स्वतःचे रक्त, नंतर तिचा खून करून स्वतः केली आत्महत्या

हॉटेलमध्ये सुरू असलेली भांडणे सोडवत असताना चार इसमांनी हितेशला जबरदस्तीने मोटारीत बसवले. त्यानंतर त्याला पिंपरी चिंचवड महापालिका इमारतीच्या मागील बाजूस असलेल्या रस्त्यावर आणले. तिथे त्याच्या डोक्यात कोयत्याने वार केले. तसेच त्याचा गळा चिरला.

यात त्यांच्यात आणि हितेश मध्ये बरीच बाचाबाचीही झाली. मात्र अखेर गंभीर जखमी झालेल्या हितेशचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.