Thane: ठाण्यात शुक्रवारी फ्लॅटच्या छताचा काही भाग कोसळल्याने एका महिलेचा मृत्यू झाला. तसेच या अपघातात (Accident) महिलेच्या चार मुली जखमी झाल्या, तर काँक्रीटची छत पडल्याने जिल्ह्यातील एका वेगळ्या घटनेत आणखी एका महिलेचा मृत्यू झाला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. 46 वर्षीय महिला आणि तिच्या मुलींचा समावेश असलेली पहिली घटना उत्तन शहरातील पाटण बंदर भागातील एका निवासी इमारतीत पहाटे 4.15 च्या सुमारास घडली, तर दुसरी घटना दुपारी भिवंडी येथे घडली, असे त्यांनी सांगितले.
पहिल्या घटनेत, पीडित सुनीता बोरगेसचा तिच्या फ्लॅटच्या छताचे प्लास्टर अंगावर कोसळल्याने जागीच मृत्यू झाला, तर तिच्या 12 ते 25 वयोगटातील चार मुली जखमी झाल्या, असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या अधिकाऱ्याने सांगितले. मीरा भाईंदर महानगरपालिका (MBMC) च्या अग्निशमन दलाच्या जवानांनी ढिगारा साफ करून घर रिकामे केले. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे, असेही अधिकाऱ्याने सांगितले आहे. (हेही वाचा - Pune Crime news: सख्ख्या भावांकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार,आरोपींना अटक; पुणे जिल्ह्यातील उरळी कांचन येथी घटना)
याशिवाय भिवंडीतील घटनेत एका 55 वर्षीय महिलेला आपला जीव गमवावा लागला. एका इमारतीच्या खिडकीचा छत खाली उभ्या असलेल्या महिलेच्या अंगावर कोसळले. भिवंडीच्या बाहेरील खाडीपार येथे दुपारी 1.20 च्या सुमारास ही घटना घडली.
शहनाज जहीर अन्सारी असे पीडितेचे नाव असून त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी इंदिरा गांधी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.