अल्पवयीन मुलीवर दोन सख्ख्या भावांनी बलात्कार (Rape) केल्याची धक्कादायक घटना पुढे येत आहे. पुणे (Pune Crime News) जिल्ह्यातील उरळी कांचन परिसरात ही घटना घडली आहे. आरोपींवर पीडितेला तिच्या आई-वडीलांना जीवे मारण्याची धिमकी दिली आणि तिच्यावर सलग 15 दिवस बलात्कार केल्याचा आरोप आहे. काही दिवसांपूर्वीच पुणे येथे एका तरुणाने तरुणीवर कोयत्याने वार केले होते. आणखी एका घटनेत एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून तरुणीची हत्या केल्याची घटना पुढे आली होती. जिल्ह्यात वारंवार अशाप्रकारच्या घटना घडत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरुन लोणी काळभोर पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. इरफान शेख आणि आयुब शेख अशी आरोपींची नावे असल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरपींना अटक केल्याची माहिती आहे. दरम्यान, घटना पुढे येताच उरळी परिसरातील नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. तसेच उरळी बंदची हाक दिली आहे. (हेही वाचा, Molestation of Woman Passenger In BEST Bus: रिक्षा नंतर आता धावत्या बेस्ट बसमध्ये महिलेवर लैंगिक अत्याचार, 5 दिवसांनी आरोपी पोलीसांच्या अटकेत)
पीडितेच्या आईने दिलेल्या माहितीनसुाह ही घटना मंगळवारी (11 जुलै) रात्री घडली. घटना घडली त्या दिवशी मुलगी खोलीत अभ्यास करत होती. तर तिची आई बाजूच्या खोलीत झोपली होती. दरम्यान, रात्री पाऊणे बाराच्या सुमारास आई लघुशंकेसाठी घराबाहेर आली. तेव्हा तिला मुलगी अभ्यास करत असलेल्या खोलीबाहेर आयुब उभा असल्याचे दिसले. त्यामुळे तिने तातडीने खोलीकडे धाव घेतली आणि खोलीचा दरवाजा उघडला. तिला खोलीमध्ये इरफान आढळून आला. मुलीच्या आईला पाहताच दोघांनीही तेथून पळ काढला. त्यानंतर पीडितेच्या आईने पीडितेला विश्वासात घेतले. त्यानंतर तिने पोलिसांमध्ये तक्रार दिली.
दरम्यान, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी या घटनेनंतर प्रतिक्रिया दिली आहे. चाकणकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ''उरुळीकांचन येथे १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला कोयत्याचा धाक दाखवून वारंवार तिच्यावर दोन आरोपीने अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे,यामध्ये पोलिस आयुक्तांशी मी स्वतः चर्चा केली असता,पीडिता व आरोपी यांची अनेक दिवसांपासून ओळख होती ,CDR मध्ये हे सतत संपर्कात असल्याचे समोर आले आहे ,आरोपीला अटक झाली असून POCSO ACT नुसार कडक कारवाई करण्यात येत आहे,राज्य महिला आयोगाकडून पाठपुरावा करण्यात येत असून पालकांनी देखील वयात येताना आपल्या पाल्यासोबतचा संवाद वाढवून त्यांना आत्मविश्वास द्यावा ,केवळ मुलींनाच नाही तर मुलांनादेखील संवादातून समुपदेशनाची मोठी गरज आहे''.