Accident | File Image

ट्रक आणि खाजगी वाहनात जोरदार धडक झाल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना नागपूर (Nagpur) येथील मल्हार नगर परिसरात आज सकाळी घडली. या अपघात दोघांचा जागेवरच मृ्त्यू झाला आहे तर, 10 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. याप्रकरणी पोलिसांनी ट्रक मालकाला अटक केली आहे. ट्रक चालक मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवत होता, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. परंतु, अद्याप यावर कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. तसेच अपघातातील मृतांच्या कुटुंबियांवर दुखाचे डोंगर कोसळले आहे.

राज्यात रस्ता अपघाताचे प्रमाण वाढत असून यावर आळा घालण्यासाठी प्रशासनाकडून अधिक प्रयत्न केले जात आहेत. यातच नागपूर येथील परिसरात घडलेल्या घटनेमुळे सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. आज सकाळी भरघाव ट्रकने खाजगी वाहनाला धडक दिली आहे. यात २ प्रवाशांचा मृत्यू झाला असून १० जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चिंताजनक म्हणजे, जखमींपैकी दोघांची अवस्था अतिशय गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. हे देखील वाचा- धुळे: भरघाव ट्रकची एसटी बसला जोरदार धडक; 27 प्रवासी खजमी

पोलीस अधिकाऱ्यानी दिलेल्या माहिती नुसार, ट्रक चालकाने भरघाव वेगाने वाहन एक खाजगी वाहनाला धडक दिली. ट्रक चालकाला ताब्यात घेतले असून पुढील चौकशीला सुरुवात झाली आहे. तसेच ज्या परिसरात ही घटना घडली तेथील सीसीटीव्ही फुटेज देखील तपासले जात आहे.