धुळे: भरघाव ट्रकची एसटी बसला जोरदार धडक; 27 प्रवासी खजमी
Accident | Image used for representational purpose | (Photo Credit: ANI)

भरघाव ट्रकने एसटी बसला जोरदार धडक दिल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना धुळे (Dhule) येथील खामगाव (Khamgaon) परिसरातील राष्ट्रीय महामार्गावर सकाळी 9.30 वाजता घडली. अकोलावरुन खामगावकडे येत असताना या बसला अपघात झाला आहे. दरम्यान, या अपघातात 27 जण जखमी झाले असून जवळच्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस त्या ठिकाणी धाव घेऊन पुढील चौकशीला सुरुवात केली. त्यावेळी स्थानिक नागरिकांनी मदतीचा हात देत जखमी प्रवाशांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. तसेच या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भितीजनक वातावरण पाहायला मिळाले.

अकोला- सिंदखेडा धुळे बस आणि ट्रक यांच्यात अपघात झाला. या अपघातात 27 प्रवाशी जखमी झाले असून त्यापैकी 22 प्रवाशांना सामान्य रुग्णालयात तर, 5 प्रवाशांना शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहेत. आज सकाळी 9.30 वाजता अकोला-सिंदखेडा बस अकोलावरुन खामगावकडे येत होती. त्यावेळी जयभवानी पेट्रोलपंपाजवळ एक कार ओव्हरटेक करत होती. यामुळे ट्रकची बसला धडक लागली. सुदैवाने यात कोणतीही जीवीतहानी झाली नाही. एक कारला वाचवण्याचा प्रयत्नात अपघात झाल्याची माहिती प्रवाशांनी दिली आहे. तसेच याप्रकरणी स्थानिक पोलीस अधिक चौकशी करत आहेत. हे देखील वाचा- पनवेल: खारघर सेक्टर 35 मधील साईस्प्रिंग इमारतीवरुन पडून तरुणीचा मृत्यू

रस्ता अपघातात महाराष्ट्र अव्वल स्थानावर असून अशा प्रकारच्या घटनेत घट व्हावी, यासाठी प्रशासनांकडून अनेक प्रयत्न केले जात आहे. वाहतूकीचे नियम मोडल्यामुळे अपघात घडत असल्याची माहिती समोर आली आहे. यात सिंग्नल तोडणे, भरघाव वेगाने वाहन चालवणे, मद्यपान करुन वाहन चालवण्यामुळे अधिक अपघात घडत असल्याचे कळत आहे.