पनवेल: खारघर सेक्टर 35 मधील साईस्प्रिंग इमारतीवरुन पडून तरुणीचा मृत्यू
(संग्रहित प्रतिमा)

पनवेल (Panvel) येथील खारघर सेक्टर 35 (Kharghar Sector-35) मधील साईप्रिंग इमारतीवरुन (Saispring building) पडून एका तरूणीला आपला जीव गमवावा लागला आहे. ही घटना रविवारी घडली. याप्रकरणी खारघर पोलीस अधिक चौकशी करत आहेत. तसेच इमारतीवरुन संबंधित तरुणी कशी पडली, यामागील नेमके कारण काय याचाही शोध घेतला जात आहे. त्याचबरोबर या तरुणीने आत्महत्या केली की यामागे कोणाचा हात आहे? याकडे पोलीस अधिक लक्ष देत आहेत. तसेच या घटनेमुळे आजूबाजुच्या परिसरात चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे.

गुरशरण कौर असे मृत तरुणीचे नाव असून ती काळंबोली येथील रहवासी आहे. याघटनेला खारघर पोलीसांनी दुजोरा दिला आहे. गुरशरण ही रविवारी साईस्प्रिंग इमारतीच्या तेराव्या मजल्यावरून पडून तिचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज पोलिसांनी लावला आहे. परंतु, गुरशरण ही इमारतीवरुन कशी पडली असा प्रश्नही उपस्थित झाला आहे. महत्वाचे म्हणजे, गुरशरण हीने आत्महत्या केली की कोणी तिला ढकलून दिले यावरुन स्थानिक पोलीस अधिक चौकशी करत आहेत. तसेच शेजाऱ्यांकडूनही अधिक चौकशी केली जात आहे. हे देखील वाचा- कोपर- दिवा स्थानकादरम्यान लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू

याआधीही करंजाडे येथे राहणाऱ्या मुलाने या धबधब्यात त्याचा आनंद घेण्यासाठी उतरला होता. मात्र, दुर्दैवाने 18 वर्षाचा मुलगा पाण्याच्या प्रवाहामुळे अधिक असल्याने तो बुडाल्याची घटना घडली होती. पनवेल येथील धबधबा अत्यंत धोकादायक असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले होते.