Monsoon 2019 | Image used for representational purpose only | (Photo Credits: PTI)

Mumbai Monsoon 2019 Updates:  मुंबई शहरामध्ये मागील काही दिवसांपासून पावसाला जोर थोडा ओसरला होता. मात्र आज पुन्हा मुंबईसह उपनगरं, ठाणे, पालघर, कल्याण शहरामध्ये दमदार पावसाला सुरूवात झाली आहे. मुंबई हवामान विभागाने सध्या पुढील दोन दिवस मुंबईमध्ये पावसाचा जोर कायम राहील असा अंदाज व्यक्त केला आहे. सध्या पुन्हा पावसाने दमदार हजेरी लावली असल्याने अनेकांची त्रेधातिरपीट उडाली आहे. आज शुक्रवार (2 ऑगस्ट) च्या सकाळी 8.30 वाजेपर्यंत सांताक्रुझ येथील वेधशाळेमध्ये मागील 24 तासामध्ये  43.4 mm पावसाची नोंद झाल्याची माहिती देण्यात आली आहे.  Mumbai Rains Forecast: पुढील दोन दिवसात मुंबईत अतिवृष्टीचा इशारा, IMD ने केले सतर्कतेचे आवाहन

मुंबई सह नवी मुंबई, ठाणे, कल्याण, पालघर परिसरामध्येही पावसाचा जोर वाढला आहे. मागील आठवड्यात अशाचप्रकारे अचानक बदलापूर, अंबरनाथ येथे पाऊस कोसळल्याने पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. सुमारे 48 तास या भागातील वीज बंद करण्यात आली होती. Monsoon 2019 Forecast: ऑगस्ट आणि सप्टेंबर 2019 मध्ये 100% पावसाची शक्यता; IMD ने वर्तवला दुसर्‍या टप्प्यातील अंदाज

नुकताच हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार कोल्हापूर, रायगड या कोकणातील भागातही अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.