Mumbai Rains Forecast: पुढील दोन दिवसात मुंबईत अतिवृष्टीचा इशारा, IMD ने केले सतर्कतेचे आवाहन
Mumbai Monsoon, Image For Representation (Photo Credits: Twitter)

Monsoon 2019 Updates: यंदा मुंबई सह उपनगरांना पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. जुलै महिन्यातच पावसामुळे मुंबईतील बहुतांश धरणे भरली आहेत. भारतीय हवामान खात्याने (India Meteorological Department) वर्तवलेल्या अंदाजानुसार येत्या काही दिवसात सुद्धा पावसाचा जोर कायम राहणार आहे. तसेच पुढील दोन दिवसात पश्चिम किनारपट्टीलगत कमी दाबाच्या पट्टा तयार झाला असल्याने मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे शनिवारी मध्यरात्रीपासून ते संपूर्ण रविवार जोरदार पाऊस होऊ शकतो अशा वेळी हवामान खात्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आव्हान दिले आहे. Mumbai Rains: 31 जुलैपर्यंतचा पाऊस हा गेल्या 60 वर्षांमधील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक पाऊस

ANI ट्विट

आज सकाळपासूनच मुंबई पूर्व व पश्चिम उपनगरातील ठाणे, नवी मुंबई, कल्याण तसेच पालघर परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. घाटकोपर, मुलुंड, कांजूरमार्ग, बोरिवली परिसरात सोसाट्याच्या वाऱ्यासोबत पावसाचा जोर वाढत असल्याचे कळत आहे.

दरम्यान मान्सून 2019 मधील निम्मा टप्पा पार पडला आहे. जून आणि जूलै महिन्यात दमदार पावसाची बरसात झाल्यानंतर पुढील दोन महिन्यात भारतात 100% पाऊस बरसण्याची शक्यता असल्याचा हवामान खात्याने वर्तवल्याने शेतकर्‍यांसाठी ही बातमी मोठी दिलासादायक ठरणार आहे.