
Monsoon 2019 Updates: मान्सून 2019 मधील निम्मा टप्पा पार पडला आहे. जून आणि जूलै महिन्यात दमदार पावसाची बरसात झाल्यानंतर पुढील दोन महिने सामान्य पाऊस बरसण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. भारतीय हवामान खात्याने (India Meteorological Department) वर्तवलेल्या अंदाजानुसार, ऑगस्ट आणि सप्टेंबर 2019 मध्येही सामान्य पाऊस बरसणार आहे.
पुढील दोन महिन्यात भारतात 100% पाऊस बरसण्याची शक्यता असल्याचा हवामान खात्याने वर्तवल्याने शेतकर्यांसाठी ही बातमी मोठी दिलासादायक ठरणार आहे. महाराष्ट्रासह देशभरात दुष्काळामुळे शेतकरी चिंतेमध्ये आहे. अनेकांनी या निराशाजनक स्थितीमध्ये आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले आहे. Maharashtra Monsoon Forecasts: रत्नागिरी, सिंधुदुर्ग भागात पुढील 2 दिवस अतिवृष्टीची शक्यता - हवामान खात्याचा अंदाज
मुंबईसह महाराष्ट्रामध्येही पावसाने यंदा दमदार बरसात केली आहे. मुंबईत जून, जुलै महिन्यात अवघ्या सात दिवसांच्या पावसामुळे विक्रमी पावसाची नोंद केली आहे. मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारे विहार तलाव देखील भरलं; एकूण पाणीसाठा 85.68%
मान्सून मिशन मॉडेलच्या अंदाजानुसार पावसाळाच्या दुसर्या टप्प्यात ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात देशात 99 टक्के पावसाची शक्यता आहे़. मॉडेल एरर 8-9 टक्के आहे. त्यामुळे दोन महिन्यांत सामान्यपणे (94 ते 106 टक्के) पाऊस बरसण्याची शक्यता 45 टक्के इतकी आहे़.
मराठावाडा अद्याप पावसाच्या प्रतिक्षेत
मुंबई,ठाणे, कोकण परिसरामध्ये धुव्वादार पाऊस बरसत असला तरीही मराठवाडा आणि विदर्भामध्ये पाऊस अंदाजापेक्षा कमी पडला आहे.
राज्यात खरीपाची पेरणी 82% पूर्ण झाली आहे. यंदा भात, ज्वारी, नाचणी, मूग, तूर, उडीद यांचे उत्पादन घटले आहे.