Coronavirus Update In Maharashtra Police: देशभरात कोरोना विषाणूने दहशत माजवली आहे. भारतातील कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येने आज 45 लाखांचा टप्पा पार केला आहे. यात महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची संख्या जास्त आहे. आतापर्यंत अनेक कोरोना योद्धे कोरोना विषाणूच्या जाळ्यात अडकले आहेत. यातील अनेकांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. मात्र, अनेकांना या लढाईत आपला जीव गमवावा लागला आहे.
गेल्या 24 तासात महाराष्ट्र पोलीस दलातील (Maharashtra Police) 189 कर्मचाऱ्यांची कोरोना चाणची सकारात्मक आली आहे. तसेच एका पोलीस कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे सध्या राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 18,405 इतकी झाली आहे. यातील 3,612 कर्मचाऱ्यांवर उपचार सुरू आहे. (हेही वाचा - Coronavirus Pandemic: महाराष्ट्रातील कोरोना संक्रमितांची जिल्हानिहाय आकडेवारी, पाहा आजचे ताजे अपडेट्स)
दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत राज्यातील 14,608 पोलीस कर्मचाऱ्यांची कोरोना विषाणू विरोधातील लढाई यशस्वी ठरली आहे. त्यामुळे त्यांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे. मात्र, 185 कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यासंदर्भात राज्य पोलीस विभागाने माहिती दिली आहे.
189 more Maharashtra police personnel tested #COVID19 positive while 1 died, in the last 24 hours. Total number of positive cases in the police force rise to 18,405 including 3,612 active cases, 14,608 recoveries & 185 deaths till date: Maharashtra Police
— ANI (@ANI) September 11, 2020
दरम्यान, गुरूवारी आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात 23,446 नवे कोरोना संक्रमित रुग्ण आढळून आले. तसेच 448 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. याशिवाय काल दिवसभरात 14,253 जणांना कोरोनावर मात केली. त्यामुळे त्यांना रुग्णांलयातून घरी सोडण्यात आलं.