Coronavirus | (Photo Credits: Pixabay)

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस (Coronavirus) संक्रमितांची संख्या दिवसागणिक वाढत असून मागील 24 तासांत 23,446 नवे रुग्ण आढळले असून राज्यात काल (10 सप्टेंबर) 448 रुग्णांची कोरोना विरुद्धची झुंज अयशस्वी ठरली असून त्यांचा मृत्यू झाला आहे. यामुळे राज्यात कोरोना बाधितांची एकूण संख्या 9 लाख 90 हजार 795 वर (COVID-19 Positive Cases) पोहोचली असून मृतांचा एकूण आकडा 28,282 (COVID-19 Death Cases) वर पोहोचला आहे अशी माहिती महाराष्ट्र आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. राज्यात काल दिवसभरतात 14,253 रुग्ण COVID-19 Recovered) बरे झाले असून आतापर्यंत 7 लाख 715 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. राज्यात सद्य घडीला 2,61,432 (COVID-19 Active Cases) रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, राज्यातील कोरोना व्हायरस संक्रमितांचा उपचारांमुळे बरे होण्याचा सरासरी दर (रिकव्हरी रेट) हा 70.72% इतका राहिला आहे. दुसऱ्या बाजूला राज्यातील कोरना रुग्णांच्या मृत्यूदराचा विचार करता तोही 2.85% इतका राहिला आहे. राज्यात कोरोना व्हायरस संसर्गाचा तपास करण्यासाठी आतापर्यंत 49,74,558 इतके नमुने प्रयोगशाळेत तपासण्यात (कोरोना चाचणी) आले. त्यापैकी 9,90,795 इतके अहवाल पॉझिटीव्ह आले. एकूण चाचण्यांपैकी कोरोना रुग्णांचा पॉझिटीव्ह येण्याचा दर 19.9% इतका राहिला आहे.

हेदेखील वाचा- Coronavirus in Mumbai: मुंबईमध्ये आज कोरोना विषाणूच्या 2,371 रुग्णांची नोंद; एकूण संक्रमित रुग्णांची संख्या 1,63,115 वर

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची जिल्हा व मनपा निहाय आकडेवारी (10 सप्टेंबर रात्री 8: 00 वाजेपर्यंत)  

अ.क्र. जिल्हा/मनपा बाधित रुग्ण मृत्यू
मुंबई मनपा १६३११५ ८०२३
ठाणे २२९९१ ५६९
ठाणे मनपा ३०१९२ १०२१
नवी मुंबई मनपा ३२४९६ ७०९
कल्याण डोंबिवली मनपा ३७०७३ ७०७
उल्हासनगर मनपा ८२७१ २९७
भिवंडी निजामपूर मनपा ४७२३ ३२९
मीरा भाईंदर १५०४७ ४६०
पालघर १०२३९ १७८
१० वसई विरार मनपा १९२३९ ४९१
११ रायगड २२७२० ५५५
१२ पनवेल मनपा १५६९३ ३३७
ठाणे मंडळ एकूण ३८१७९९ १३६७६
नाशिक १२३३३ ३०१
नाशिक मनपा ३५००३ ६००
मालेगाव मनपा ३००५ १२५
अहमदनगर १६०७७ २१७
अहमदनगर मनपा १०८३५ १७०
धुळे ५४६७ १३७
धुळे मनपा ४७६६ १२५
जळगाव २६४३६ ७६९
जळगाव मनपा ७७९१ २०४
१० नंदुरबार ३६०६ ९६
नाशिक मंडळ एकूण १२५३१९ २७६७
पुणे ३७९६९ ८८०
पुणे मनपा १२२२६० २८७०
पिंप्री-चिंचवड मनपा ५८२७३ ८८४
सोलापूर १७५१४ ४४७
सोलापूर मनपा ७६१३ ४५३
सातारा २१६७४ ५२५
पुणे मंडळ एकुण २६५३०३ ६०५९
कोल्हापूर २१२८८ ६३६
कोल्हापूर मनपा ९३२१ २४०
सांगली १०४१० ३२०
सांगली मिरज कुपवाड मनपा ११५४५ ३३४
सिंधुदुर्ग २१५७ २६
रत्नागिरी ५६३२ १७७
कोल्हापूर मंडळ एकुण ६०३५३ १७३३
औरंगाबाद ९६२९ १४९
औरंगाबाद मनप १८०३८ ५८२
जालना ५५९५ १६१
हिंगोली १९४६ ४३
परभणी १९१५ ५५
परभणी मनपा १८९६ ५६
औरंगाबाद मंडळ ७९३एकूण ३९०१९ १०४६
लातूर ६८७३ २०८
लातूर मनपा ४६३७ १२८
उस्मानाबाद ८०२६ २२०
बीड ६३३९ १७५
नांदेड ६०८५ १५१
नांदेड मनपा ४५६७ १३२
लातूर मंडळ एकूण ३६५२७ १०१४
अकोला २३४५ ६७
अकोला मनपा २५९२ १०१
अमरावती २००७ ५३
अमवरावती मनपा ५१६५ १०७
यवतमाळ ४६०० १००
बुलढाणा ४६८६ ९१
वाशीम २४४२ ४६
अकोला मंडळ एकूण २३८३७ ५६५
नागपूर १०४५९ १३४
नागपूर मनपा ३४२४१ १०५९
वर्धा २०१९ २३
भंडारा २४०८ ३०
गोंदिया २७६९ ३०
चंद्रपूर २७६२ २७
चंद्रपूर मनपा १९३५ २५
गडचिरोली १०५९
नागपूर मंडळ एकूण ५७६५२ १३२९
इतर राज्य ९८६ ९३
एकूण ९९०७९५ २८२८२

भारतात एकूण कोरोनाबाधितांचा आकडा थेट 44,65,864 वर पोहचला आहे. आजवरच्या कोरोना बळींचा आकडा सुद्धा 75, 062 इतका झाला आहे. कोरोनावर मात केलेल्या नागरिकांची संख्या 34,71,784 इतकी झाली आहे