Coronavirus scanning at an airport (Photo Credit: PTI)

मुंबईमध्ये आज कोरोना विषाणूच्या 2,371 रुग्णांची नोंद झाली आहे. यामध्ये रुग्णांची दुहेरी नोंद व मुंबई बाहेरील रूग्णांच्या रिकंसीलेशन नंतर आजची बाधित रुग्णांची संख्या कमी होऊ शकते. यासह एकूण संक्रमित रुग्णांची संख्या 1,63,115 वर पोहोचली आहे. आज मुंबईमध्ये 1,367 कोरोनाचे रुग्ण बरे झाले असून, आतापर्यंत एकूण 1,28,112 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या मुंबईमध्ये 26,632 इतक्या संक्रमित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आज मुंबईमध्ये 38 कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून, आतापर्यंत एकूण 8,020 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आज मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी 31 रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. त्यातील 26 रुग्ण पुरुष व 12 रुग्ण महिला होत्या. यातील 1 जणाचे वय 40 वर्षा खाली होते. 29 जणांथे वय 60 वर्षा वर होते, तर उर्वरित 8 रुग्ण 40 ते 60 वर्षा दरम्यान होते. मुंबई जिल्ह्यातील बरे झालेल्या रुग्णांचा दर 79 टक्के आहे. 3 सप्टेंबर ते 9 सप्टेंबर पर्यंत मुंबईतील एकूण कोविड बाढीचा दर 1.14 टक्के आहे. 9 सप्टेंबर 2020 पर्यंत झालेल्या कोविडच्या एकूण चाचण्या 8,72,155 इतक्या आहेत. यासह मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा दर 61 दिवस झाला आहे. (हेही वाचा: महाराष्ट्र पोलिस दलात कोरोना संपेना, 24 तासात पुन्हा 244 नवे रुग्ण आणि 4 मृत्यु)

पीटीआय ट्वीट -

प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून, 9 सप्टेंबर नुसार मुंबईमधील सक्रिय कंटेनमेंट झोन (झोपडपट्ट्या आणि चाळी) ची संख्या 544 इतकी आहे, तर सक्रिय सीलबंद इमारती 7,528 आहेत. दरम्यान, महाराष्ट्रामध्ये आज कोरोना विषाणूच्या 23,446 रुग्णांची नोंद झाली असून, आज संक्रमित 448 जणांचा मृत्यू झाला आहे. आज राज्यामध्ये 14,253 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. यासह राज्यातील एकूण संक्रमितांचा आकडा आकडा आता 9,90,795 इतका झाला आहे. आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये 7,00,715 कोरोना बाधित रुग्णांना सोडण्यात आले आहे.