Maharashtra Police | (File Photo)

Coronavirus Update In Maharashtra Police: महाराष्ट्र पोलिस दलात आज, 10 सप्टेंंबर रोजीच्या अपडेटनुसार, पुन्हा 244 नवे कोरोनाबाधित कर्मचारी आढळुन आले आहेत. यानुसार राज्य पोलिस दलातील आजवरच्या एकुण कोरोनाबाधितांंची संख्या 18 हजार 216 इतकी झाली आहे. प्राप्त माहितीनुसार, मागील 24 तासात कोरोनामुळे 4 पोलिस कर्मचार‍‍र्‍यांंचा मृत्यु सुद्धा झाला होता त्यामुळे कोरोनामृतांंचा आकडा 184 इतका झाला आहे. आजवर आढळलेल्या 18,216 रुग्णांंपैकी 14 हजार 456 रुग्णांंनी आजवर या जीवघेण्या विषाणुवर मात केली आहे. तर सद्य घडीला 3 हजार 576 कोरोनाबाधित अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत ज्यांंच्यावर उपचार सुरु आहेत. यापैकी बहुतांंश जणांंची प्रकृती नियंंत्रणात आहे. महाराष्ट्र 10 लाख कोरोना रुग्णसंख्या गाठण्याच्या मार्गावर, पहा कोणत्या जिल्ह्यात किती कोरोनाबाधित

आपण जाणताच की, कोरोना व्हायरस सुरु होताचा सोशल डिस्टंंसिंग ची सक्ती करण्यात आली होती त्यावेळेस पोलिस 24 तास कडक बंंदोबस्तात गस्त घालत होते. मात्र मागील काही दिवसात अनेक प्रसंंगात या अंतर राखा नियमाचा फज्जा उडत आहे. कंंगना मुंंबईत येण्याचा कालचा प्रकार असो वा रिया च्या चौकशी दरम्यान होणारी गर्दी प्रत्येक ठिकाणी गर्दीला रोखण्यासाठी पोलिसांंना पुढे जावे लागत असल्याने त्यांंच्या जीवालाही धोका निर्माण होत आहे.

ANI ट्विट

दुसरीकडे देशात आज कोरोनाबाधितांंमध्ये सर्वात मोठी अशी 95,735 रुग्णांंची वाढ झाली आहे, देशातील कोरोना रुग्णांंची संख्या 44 लाखाच्या पार आहे. यापैकी सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आढळले आहेत. राज्यात आजवर 9,67,349 रुग्ण आढळुन आले आहेत यापैकी 2,52,734 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.