Coronavirus In India: देशात कोरोना वाढीचा रेकॉर्ड! 24 तासात सापडले 95, 735 नवे रुग्ण, एकुण बाधितांंचा 44,65,864 आकडा वर
Coronavirus (Photo Credits: Twitter)

Coronavirus Update In India: देशात कोरोनाबाधितांंच्या संख्येत आजवरची सर्वात मोठी वाढ झाल्याचे समजत आहे, देशात मागील 24 तासात एकुण 95,735 नवे कोरोना रुग्ण आढळुन आले आहेत. यानुसार एकुण कोरोनाबाधितांंचा आकडा थेट 44,65,864 वर पोहचला आहे. कालच्या दिवसभरात देशात एकुण 1,172 जणांंचा कोरोनामुळे मृत्यु झाला असुन आजवरच्या कोरोना बळींंचा आकडा सुद्धा 75, 062 इतका झाला आहे. दिलासादायक बाब अशी की कालच्या दिवसात एकुण 72,939 जणांंना डिस्चार्ज देण्यात आला ज्यानुसार कोरोनावर मात केलेल्या नागरिकांंची संंख्या 34,71,784 इतकी झाली आहे.देशात सध्या कोरोनाचा रिकव्हरी रेट हा 77. 77% इतका आहे तर आजवर मृत्यु झालेल्यांंपैकी 70% रुग्ण हे अन्य आजारांंनी ग्रासलेले होते अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंंत्रालयाने दिली आहे. COVID-19 Vaccine Update: कोविशिल्ड लसीची मानवी चाचणी भारतात सुरु राहणार; युके मधील स्थगितीनंतर सीरम इंस्टीट्यूटची माहिती

देशात कोरोना व्हायरस बाधित रुग्ण प्राथमिक पातळीवरच शोधुन काढण्यासाठी रॅपिड अ‍ॅंटीजन टेस्ट चे प्रमाण वाढवण्यात आले आहे. आयसीएमआर च्या माहितीनुसार काल देशातील 1000 हुन अधिक खाजगी व सरकारी लॅब मधुन कोरोनाचे 11, 29,756 सॅपल्स जमा करण्यात आले ज्यानुसार आजवरच्या चाचण्यांंचा आकडा 5,29,34, 433 इतका झाला आहे.

ANI ट्विट

दरम्यान, जगभरातील कोरोना बाधितांच्या संख्येत भारताने आता ब्राझीलला मागे टाकले आहे. कोरोनाग्रस्तांच्या संख्येत अमेरिका प्रथम असून भारत दुसऱ्या स्थानी आहे. कोरोनाच्या भारतीय व ऑक्सफॉर्ड युनिव्हर्सिटीच्या लसीची सध्या मानवी चाचणी सुरु आहे तर रशियाच्या कोरोना लसीची चाचणी भारतात घेण्याबाबत सध्या चर्चा सुरु आहे.