Boy Drown in Swimming Pool : पोहणे शिकण्यासाठी गेलेल्या 17 वर्षीय मुलाचा स्विमिंग पूलमध्ये बुडून मृत्यू, पोहताना दम लागल्याने मृत्यू झाल्याचा अंदाज
representative photo

Boy Drown in Swimming Pool : परिक्षा संपताच उन्हाळ्याच्या सुट्ट्यांत पोहणे शिकण्यासाठी (swimming classes) विद्यार्थ्यांनी जलतरण तलांवाकडे धाव घेतली आहे. मात्र जलतरण तलावांकडे पाठवणाऱ्या विद्यार्थ्यांचया पालकांनी योग काळजी घेण्याची आवश्यकता आहे. कारण, नवी मुंबईच्या वाशीत (vashi) एका विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू झाला आहे. मयूर दमाले (17) असे या विद्यार्थ्याचे नाव असून तो फादर ॲग्नेल महाविद्यालयात अकरावीत शिक्षण घेत होता. मयूर दुपारी जलतरण तलावात पोहण्यास गेला होता. मात्र पोहताना दमछाक झाल्याने तो बुडाला. शनिवारी दुपारी ही घटना घडली. (हेही वाचा : Mumbai: खासगी शाळेच्या जलतरण तलावात बुडून 14 वर्षीय मुलाचा मृत्यू)

मृत मयूर हा नेरुळ येथे राहत होता. नुकतीच त्याची अकरावीची परीक्षा झाली होती. त्यामुळे मयूर पोहण्याच्या शिकवणीसाठी जात होता. शनिवारी दुपारी मयूर स्विमिंग पूलमध्ये पोहण्यासाठी गेला होता. यावेळी मयूरला पोहताना दम लागल्याने तो स्विमिंग पूलमध्ये बुडाला. त्यानंतर मयूरला तात्काळ बाहेर काढण्यात आले.

बाहेर काढल्यानंतर त्याला कृत्रिम श्वास देण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण त्याचा काहीच उपयोग न झाला नाही. त्याला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आले. या घटनेनंतर वाशी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली तसेच सीसीटीव्ही फुटेजची देखील तपासणी केली. त्यानंतर वाशी पोलिसांनी रात्री उशिरा याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.