Private School in Goregaon East: मुंबई येथील एका शाळेत धक्कादायक घटना घडली आहे. शार्दुल मधुकर आरोलकर नामक एका 14 वर्षीय मुलाचा शाळेच्या जलतरण (Swimming Pool) तलावात बुडून (Drowning) मृत्यू झाला आहे. ही घटना घटना गोरेगाव पश्चिम (Goregaon East) येथील गोकुळधाम, यशोधाम स्कूलमध्ये घडली. शार्दुल याच्या मृत्यू नंतर विद्यार्थी, पालक आणि परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या मुलाच्या मृत्यूसाठी शाळा प्रशासन आणि ट्रेनरच कारणीभूत आहे. त्यामुळे प्रशासन आणि संबंधीत ट्रेनरवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पालकांमधून केली जात आहे. काल (24 जून) दुपारी घडलेल्या या घटनेमुळे पालकांमध्ये संतापाची प्रचंड लाट उसळल्याचे पाहायला मिळाले.
शार्दुल हा आपल्या आई-वडीलांसोबत बोरीवली येथील योगीनगर परिसरातील शासकीय वसाहतीत राहायचा. त्याचे वडील संजय मधुकर आरोलकर हे दिंडोशी कोर्टात कामाला आहेत. तो यशोधाम स्कूलचा विद्यार्थी होता. स्कूलच्या गोकुळधाममध्ये एक स्विमिंग पुल आहे. ज्यात शार्दुल हा पाठिमागच्या सहा महिन्यांपासून पोहण्यासाठी जात होता. त्याचा पोहण्याचा प्राथमिक कोर्स सुरु होता. स्विमींग पुलामध्ये व्यवस्थापणाच्या वतीने चार स्विमिंग ट्रेनर कार्यकरत आहेत. जे विद्यार्थ्यांना पोहण्याचे शिक्षण देत असत. (हेही वाचा, Lonavala: लोणावळ्यात सहलीसाठी आलेल्या मुंबईतील एका विद्यार्थ्याचा धबधब्यात बुडून मृत्यू)
दरम्यान, संजय आरोलकर यांच्या पत्नीने त्यांच्या फोनवर शुक्रवारी (23 जून) दुपारी साडेबारा वाजता फोन केला. तसेच, मुलगा शार्दुल याला लाईफलाईन रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगितले. त्यामुळे संजय आरोलकर हे देखील तातडीने तेथे आले. मात्र, शार्दुलची प्रकृती गंभीर असल्याने त्याला नंतर शताब्द रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले.
ट्विट
Mumbai | A 14-year-old boy named Shardul Sanjay Aarolkar died due to drowning in the swimming pool of a private school, in Goregaon East yesterday. The boy was declared brought dead by the doctors: BMC
— ANI (@ANI) June 24, 2023
पोलिस तपासात पुढे आलेल्या माहितीनुसार, शार्दुल याला पाण्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे तो बुडू लागला. तो बुडत असल्याचे लक्षात येताच सागर नावाच्या ट्रेनरने त्याला पाण्याबाहेर काढले. मात्र, तो बेशुद्ध होत होता. या वेळी त्याला प्राथमिक उपचारानुसार उलटीद्वारे त्याच्या शरीरातील पाणी काढण्यात आले. मात्र, तो बेशुद्ध झाल्याने त्याला लाईफलाईन रुग्णालयात नेण्यात आले. पुढे रुग्णालयातच त्याचा मृत्यू झाला. शार्दुलच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार दिंडोशी पोलिसांनी मृत्यूची नोंद घेऊन तपास सुरु ठेवला आहे.