कांद्याचे भाव दिवसेंदिवस गगनाला भिडत चालले असून कांदा (Onion) चोरांचा सुळसुळाटही वाढत चालला आहे. कांद्याचे वाढते दर हे डोळ्यात पाणी आणणारे पोटाची खळगी भरण्यासाठी आता लोक कांदा चोरी करु लागले आहेत. त्यात आता नवीन चोरीची घटना उघडकीस आली आहे. मुंबईतील डोंगरी मार्केटमध्ये 168 किलो कांद्याची चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी डोंगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.
डोंगरीच्या नवरोजी हिल रोडवरील मार्केटमध्ये अकबर शेख यांचे कांदा बटाटा विक्रीचा अधिकृत स्टॉल आहे. अकबर यांनी पाच डिसेंबर रोजी कांद्याच्या 22 गोणी या स्टॉलमध्ये ठेवल्या होत्या. मटा च्या वृत्तानुसार, या 22 गोण्यांमध्ये 112 किलो कांदा होता. दुसऱ्या दिवशी म्हणजे सहा डिसेंबर रोजी सकाळी आठ वाजता अकबर यांनी नेहमीप्रमाणे स्टॉल उघडला असता कांद्याच्या सर्व गोणी गायब होत्या. हा प्रकार पाहून अकबर शेख यांना धक्काच बसला.
हेदेखील वाचा- नाशिक येथे 1 लाख रुपयांचा कांदा चोरीला, उत्पादकाकडून पोलिसात तक्रार दाखल
काळजीपोटी त्यांनी आजूबाजूच्या दुकानात या विषयी चौकशी केली असता त्याचाच एक सह व्यापारी इरफान शेख या विक्रेत्याच्या दुकानातूनही देखील 56 किलो कांद्याची गोणी चोरीला गेल्याचे उघडकीस आले.
त्यामुळे या दोघांनाही हा चोरीचा प्रकार असल्याचे उघडकीस आले. त्यामुळे त्यांनी त्वरित जवळील डोंगरी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. मिळालेल्या माहितीनुसार डोंगरी पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि परिसरात चौकशी करुन चोरांचा तपास सुरु केला आहे.
जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढले तरी कोणाला काही फरक पडत नाही, कोणी त्याचा विरोध करत नाही पण आज कांद्याचा भाव वाढत असताना सर्वांच्या चर्चेला ऊत आला आहे, वास्तविक कांदा न खाल्ल्याने कोणीही मरत नाहीये.. उलट शेतकऱ्याला चार पैसे अधिक मिळून फायदा होत आहे मात्र याचा सर्वांना त्रास होत आहे. अशी भूमिका आज आमदार बच्चू कडू (Bachhu Kadu) यांनी पुणे (Pune) येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलत असताना मांडली आहे. मागील काही दिवसांपासून कांद्याच्या भावात (Onion Rates) होणाऱ्या सातत्यपूर्ण वाढीनंतर आज पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्रमात बच्चू कडू यांनी कांदा पूजन केले यानंतर उपस्थितांना संबोधित करता असताना त्यांनी कांदा वाढीतून शेतकऱ्यांना फायदा होत असल्याचा आनंद व्यक्त केला.