नाशिक येथे 1 लाख रुपयांचा कांदा चोरीला, उत्पादकाकडून पोलिसात तक्रार दाखल
कांदा (Photo Credit : ThoughtCo)

सध्या देशभरात कांद्याचे (Onion) भाव दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. यामुळे सामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री बसल्याची स्थिती निर्माण झाली आहे. याच परिस्थितीत नाशिक येथून तब्बल 1 लाख रुपयांचा कांदा चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी कांदा उत्पादकाकडून पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून त्याबाबत अधिक तपास केला जात आहे.

कळवण तालुका येथे राहणाऱ्या बाजीराव पगार यांचा कांदा चोरीला गेल्याचा प्रकार समोर आला. राहुल यांच्या गोदामध्ये एकूण 117 क्रेट्समध्ये 25 टन कांद्यांची साठवण करुन ठेवली होती. मात्र या एकूण कांद्याच्या साठ्यामधील 1 लाख रुपयांचा कांदा चोरीला गेला आहे. याबाबत तातडीने राहुल यांनी पोलिसात धाव घेत त्याबाबच अधिक माहिती दिली.

या प्रकरणी अज्ञात आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर चोरी झालेला कांदा गुजरात आणि स्थानिक बाजारात विक्रीसाठी घेऊन जाण्यात आला असल्याचे संशय व्यक्त केला जात असून त्याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. दुसऱ्या बाजूला देवळा तालुकामधील विष्णू आहेर यांच्या कांद्याच्या शेतीत काही समाजकंटकांनी रासायनिक युरिया टाकल्याने त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्रकार सुद्धा समोर आला आहे.(कांदा रडवणार! दर प्रति किलो 70-80 रुपयांच्या घरात गेल्याने सामान्यांच्या खिशाला कात्री)

राज्यातील कांदा उत्पादकांनी प्र राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे त्याचा परिणाम कांद्यावर झाला असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे कांद्याचे भाव आता आकाशाला भिडले आहेत. गेल्या आठवड्यात कांद्याचे दर 56 रुपये किलो होते. मात्र आता त्याचेच दर 70 रुपयांच्या घरात जाऊन पोहचले आहेत.