प्रतिकात्मक फोटो (Archived, edited, symbolic images)

राजधानी दिल्लीसह (Delhi) देशामधील अन्य राज्यात कांद्याचे दर आता दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. त्यामुळे कांदा आता रडवणार असून त्याचे दर प्रति किलो 70-80 रुपयांच्या घरात पोहचले आहे. यामुळे सामान्यांचा खिशाला कात्री बसणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. तर केंद्र सरकारकडून कांद्याच्या भावाबाबत अधिक विचार केला जात आहे.सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रमुख कांदा उत्पादकांनी राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे त्याचा परिणाम कांद्यावर झाला असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे कांद्याचे भाव आता आकाशाला भिडले आहेत. तर दिल्ली येथे गेल्या आठवड्यात कांद्याचे दर 57 रुपये प्रति किलो होते. तर मुंबईत 56 रुपये, कोलकाता येथे 48 रुपये आणि चेन्नई येथे कांद्याचा दर 34 रुपये किलो होता. मात्र या आठवड्यात कांद्याच्या दरात वाढ झाली असून त्याचे दर 70-80 रुपयांच्या घरात पोहचले आहेत.

केंद्र सरकारकडून कांद्याचे दर कमी करण्यासाठी प्रयत्न सुद्धा करण्यात आले. मात्र कांद्याचे दर दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. परंतु पुढील दोन-तीन दिवसात कांद्याचे दर जर कमी न झाल्यास केंद्र सरकारकडून साठवणूकीतील कांद्याची सीमा ठरवण्यात येणार आहे. त्याचसोबत हवामान खात्याच्या अंदाजानुसार, प्रमुख कांदा उत्पादन क्षेत्रातील महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र, प्रदेश, गुजरात, राजस्थान आणि मध्य प्रदेश येथे गेल्या काही दिवसात मुसळधार पाऊस झाला असल्याचे सांगण्यात आले आहे.(नाशिक: लासलगाव बाजारात कांद्याचा भाव शंभरी पार; 4 वर्षातील उच्चांकी दर)

व्यापाऱ्यांचे असे म्हणणे आहे की, देशातील बहुतांशी ठिकाणी साठवणूकीतील कांद्याची विक्री केली जात आहे. मात्र नोव्हेंबर महिन्यापासून नवा कांदा बाजारात येणार असल्याचे ही व्यापाऱ्यांनी सांगितले आहे.यापूर्वी सप्टेंबर 2015 साली कांद्याचा प्रति 100 किलो मागे 4300 रुपये तर ऑगस्ट 2015 मध्ये आतापर्यंतचा सर्वाधिक म्हणजे प्रति क्विंटल 5,700 रुपये इतका दर रेकॉर्ड झाला होता.