Maharashtra Monsoon Forecast: महाराष्ट्रात मागील काही दिवसांंपासुन मध्य आणि पुर्व महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला आहे. विदर्भ (Vidarbha) , मराठवाडा (Marathwada) भागात पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत. अशातच आता आयएमडी (IMD) ने ही परिस्थिती पुढील 4 ते 5 दिवस कायम राहणार असल्याचे अंदाज वर्तवले आहेत. आयएमडी कडुन जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार महराष्ट्रात मुख्यतः मराठवाडा आणि लगतच्या भागात येत्या चार पाच दिवसात मध्यम ते मुसळधार स्वरुपाचा पाऊस होईल असा अंदाज आहे. यामध्ये 17 सप्टेंंबर पासुन पावसाचा जोर आणखीन वाढेल असेही सांंगण्यात आले आहे. आयएमडीचे उपमहासंचालक के.एस. होसाळीकर (K.S. Hosalikar) यांंनी याविषयी ट्विटमधुन माहिती दिली आहे.
प्राप्त माहितीनुसार, हवामान खात्याने 17 सप्टेंंबर पासुन कमी दाबाचा एक पट्टा निर्माण होईल आणि म्हणुन पावसाचा जोर वाढेल असे सांंगितले आहे. तर मुंंबई व कोकणात काही दिवस अगदी तुरळक पाऊस होईल असेही सांंगण्यात आले आहे.
के. एस. होसाळीकर ट्विट
With formation of low pressure over west central bay, north of CAP, marathwada & adjoining areas of Mah very likely to recv mod to hvy rains in coming 4-5 days, with enhanced activity likely frm 17 Sept.
Another low pressure likely to form ~ 17 Sept.
Mumbai rains light to mod.🌦 pic.twitter.com/WKgRikHNa6
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) September 14, 2020
दरम्यान यंदा महाराष्ट्रामध्ये सरासरीच्या 12% अधिक पाऊस झाला आहे. मुबलक पाऊस झाल्याने पाण्याची चिंता टळल्याचे संकेत आहेत. यंदा ऑगस्ट महिन्यात जोरदार पाऊस बरसला होता. त्या तुलनेत आता सप्टेंबर महिन्यात पावसाने उसंत घेतली आहे, तरी पावसाचे महिने संपेपर्यंत तुरळक पाऊस कायम राहिल असे अंदाज आहेत.