Coronavirus | Representative Image (Photo Credit: PTI)

Coronavirus Cases In Mumbai: महाराष्ट्राची राजधानी मुंबईमध्ये (Mumbai) कोरोना विषाणूने (Coronavirus) धुमाकूळ घातला आहे. आज मुंबईमध्ये 1308 नवे कोरोना बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तसेच दिवसभरात 39 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे आज 1,497 रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे.

सध्या मुंबई शहरातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 91,457 वर पोहोचली आहे. आतापर्यंत मुंबईमध्ये 63 हजार 431 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. सध्या मुंबईमध्ये 22 हजार 779 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. याशिवाय आतापर्यंत 5 हजार 241 रुग्णांचा कोरोना विषाणूमुळे मृत्यू झाला आहे. यासंदर्भात मुंबई महानगरपालिकेने (Brihanmumbai Municipal Corporation) माहिती दिली आहे. (हेही वाचा - महाराष्ट्रात आज COVID19 च्या आणखी 8139 रुग्णांची भर तर 223 जणांचा बळी; राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 2,46,600 वर पोहचला)

दरम्यान, आज महाराष्ट्रात 8139 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. तसेच 223 रुग्णांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. याशिवाय 4360 जणांनी आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा 2,46,600 इतका झाला आहे. यातील 99,202 रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच आतापर्यंत 1,36,985 जणांना कोरोनावर मात केली आहे. याशिवाय राज्यात आतापर्यंत 10,116 रुग्णांचा कोरोनामुळे बळी गेला आहे.