कोणत्याही धार्मिक कार्यात तांदळाला का आहे इतके महत्व? जाणून घ्या अक्षतांच्या दाण्यात दडलेलं सुख-समृद्धी आणि धनलाभाचे गुपित
Rice (Photo Credits: PixaBay)

कोणतेही धार्मिक कार्य म्हटलं की त्यात हळद-कुंकू हे जितके महत्त्वाचे असते तितकेच तांदूळ ज्याला आपण अक्षता म्हणतो त्यालाही फार श्रेष्ठ स्थान आहे. लग्नकार्यात हे तांदूळ अक्षता वधू-वराच्या डोक्यावर पडले की लग्न संपन्न झाले असे म्हणतात. तांदळाचा वापर अन्न म्हणून केला जातो पण याच दाण्यामध्ये धनलाभ, सुख-समृद्धी यांसारख्या गोष्टींचे गमक दडलेले आहे. जसं भात खाल्ल्याशिवाय काही लोकांचे जेवण पूर्ण होत नाही तसेच कोणत्याही कार्यात अक्षतांशिवाय ती पूजा पुर्णत्वास पोहोचत नाही.

तांदूळ (Rice) हा अन्नातील महत्त्वाचा घटक आहे आणि अन्न हे ब्रह्मस्वरुप असून त्यात ईश्वराचा अंश आहे म्हणून आपण त्याचा आदर केलाच पाहिजे. अशा या छोट्याशा दिसणा-या तांदळाच्या दाण्याचे महत्वही तितकेच जास्त आहे, पाहूयात कशा पद्धतीने तांदळामुळे होतो धनलाभ:

1. जर एखाद्या व्यक्तीस आपल्या जीवनात यश मिळविण्यामध्ये अडथळ्यांचा सामना करावा लागत असेल आणि आपल्या कारकीर्दीत प्रगती मिळवायची असेल तर यासाठी त्याने गोड भात बनवावे आणि ते छतावर पसरवावे जेणेकरुन कावळ्याने खाल्ले तर त्याचा आपल्याला निश्चितच फायदा होईल. आपण असा उपाय केला तर लवकरच चांगली नोकरी मिळवणे शक्य आहे.

हेदेखील वाचा- शुभकार्यात का महत्वाचे मानले जाते विड्याचे पान; जाणून घ्या धार्मिक महत्व

2. एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत जर पितृ दोष असेल तर त्यासाठी कावळ्यांना तांदळाची खीर आणि भाकर खायला द्या अशी समजूत आहे की ही युक्ती कुटुंबात आनंद आणि समृद्धी आणते आणि यामुळे पितृ दोष देखील दूर होतो, यामुळे व्यक्तीचे जीवन सुखी होते.

3. जर एखाद्या व्यक्तीस आपल्या जीवनात पैशाची कमतरता भासत असेल तर, त्या साठी 21 तांदूळाचे दाणे त्याच्या पर्समध्ये लाल रेशीम कपड्यात ठेवावे, परंतु शुक्रवारी हा उपाय तुम्हाला करावा लागेल कारण या कामासाठी शुक्रवार शुभ दिवस मानला जातो. असे मानले जाते की या उपायाद्वारे व्यक्तीच्या जीवनात संपत्ती येऊ लागते आणि सुखसमृद्धी लाभते.

4. एखाद्याच्या घरात जर दारिद्रय असेल आणि त्यापासून मुक्त व्हायचे असेल तर यासाठी अर्धा किलो तांदूळ घेऊन शिवलिंगासमोर बसा, त्यानंतर तांदळाच्या ढिगातुन एक मूठभर तांदूळ घेऊन शिवलिंगाला अर्पण करा. हा उपाय शिव मंदिरातच दान करा, तुम्हाला हे सलग पाच सोमवार करावे लागेलं, जर तुम्ही हा उपाय अवलंबिला तर तुमच्या घरातील गरिबी दूर होईल.

दिसायला अतिशय छोटे वाटणारे हे तांदळाचे दाणे आपल्या आयुष्यात खूपच महत्त्वाचे आहेत जे कदाचित आपले नशीबही बदलू शकतील.

(सूचना: वरील मजकूर केवळ प्राप्त माहितीवर आधारित आहे.  यास सल्ला समजू नये. लेटेस्टली मराठी त्या मजकूराची पुष्टी करत नाही.)