सुट्टीत गोव्याला जाण्याचा प्लान करत असाल, तर '10' गोष्टींची घ्या विशेष काळजी
Goa (Photo Credits: PixaBay)

रोजच्या धकाधकीच्या जीवनाला कंटाळलेल्या लोकांची सु्ट्टी पडली की आपोआप पावलं पडतात ती निसर्गरम्य ठिकाणाकडे. यात लोकांना आवश्यकता असते ती निळ्याशार समुद्राची, शांततेची. अशावेळी लोकांची पहिली पसंतीचे ठिकाण असते ते 'गोवा'. निळाशार समुद्र असं निसर्गाच्या कुशीत दडलेले हे गोवा हे पर्यटकांसाठी नेहमी आवडीचे ठिकाण राहिले आहे. कारण येथे तुम्हाला निसर्गाची मजाही अनुभवता येते आणि पब, डिस्कोच्या माध्यमातून आयुष्याची मजाही अनुभवता येते.

पण ही गोष्ट विसरता कामा नये गोव्यात केवळ मुंबईतील नव्हे तर देश-विदेशातील पर्यटकही येतात. त्यामुळे अशा गर्दीच्या ठिकाणी जाताना काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे.

1. पर्यटनाची काळजी घ्या

गोव्यात जर तुम्ही तुमचे खाजगी वाहन घेऊन जात असाल, तर पार्किंगची व्यवस्था नीट आहे का ते तपासा. तसेच गोव्यात फिरण्यासाठी तुम्हाला भाड्याने गाडी मिळते.

हेदेखील वाचा- प्रवासादरम्यान उलट्या होण्याच्या समस्येचे निराकरण करतील हे 5 घरगुती उपाय

2. समुद्रात उतरण्याआधी काळजी घ्या

गोव्यातील समुद्र पाहिला तर पर्यटकांचा मोह आवरत नाही. त्यामुळे समुद्रात पोहण्यास उतरण्याआधी पाण्याचा अंदाज घ्या. तसेच योग्य पद्धतीचे कपडे परिधान करा.

3. स्वच्छता:

पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या या शहरात जाताना स्वच्छतेची काळजी घ्या. इतरत्र कचरा फेकू नका.

4. विदेशी पर्यटकांशी चांगला व्यवहार ठेवा

गोव्यात येणा-या विदेशी पर्यटकांशी नीट व्यवहार करा. विनाकारण कमी कपड्यातील महिलांशी असभ्य वर्तन करणे टाळा.

5. मद्यपान करताना विशेष काळजी घ्या

गोव्यात दारू स्वस्त मिळते म्हणून प्रमाणाच्या बाहेर ती पिणे टाळा. विशेष करुन तुम्ही वाहन चालवणार असेल तर विशेष काळजी घ्या.

6. महिलांनी उंच टाचेच्या चपला वापरणे टाळा:

समुद्र किना-यावर असलेल्या वाळूमुळे उंच टाचेच्या चपला त्यात रुतण्याची शक्यता असते. त्यामुळे गोव्याला जात असताना सोयीस्कर अशा चपला घेऊन जा. अनुकल वातावरण आणि मार्च महिन्यातील सुट्ट्यासांठी या ठिकाणांनी जरुर भेट द्या

7. कसिनोमध्ये जाताना घ्यायची काळजी:

खेळताना गंमत खेळत असाल तर छोटीशी रक्कम घेऊन खेळा, मोठा खर्च करु नका.

8. भुरट्या चोरांपासून सावधान:

प्रवासादरम्यान बाळगलेली तुमची महत्त्वाची कागदपत्रे, अमूल्य वस्तू, दागदागिने, पैसे शक्यतो हॉटेलमध्ये सोडू नका. आपल्यासोबत व्यवस्थित बाळगा. नीट लक्ष ठेवा.

9. स्थानिकांशी नीट वागा:

आपण दुस-या राजयात जात आहात त्यामुळे तेथील लोकांशी नीट वागणूक ठेवा. वादविवाद शक्यतो टाळा.

10. सतर्क राहा

एखादी व्यक्ती तुम्हाला फ्री पासेस देत असेल तर नम्रपणे नकार द्या. मोठ्या क्लबमधील डान्स अथवा इतर गोष्टींचे आमिष दाखवत असतील तर नक्कीच काही गडबड आहे हे ध्यानात घ्या. सतर्क राहा.

या गोष्टींची विशेष काळजी घेऊन तुम्हाला हवी तशी मजा तुम्ही गोव्यात करु शकता. फक्त हे सर्व करत असताना फक्त आजूबाजूला नीट ठेवा.