अनुकल वातावरण आणि मार्च महिन्यातील सुट्ट्यासांठी या ठिकाणांनी जरुर भेट द्या
अनुकल वातावरण आणि मार्च महिन्यातील सुट्ट्यासांठी या ठिकाणांनी जरुर भेट द्या (Photo Credits-Facebook)

मार्च महिन्यात वातावरण हे अनुकल असते. तसेच येत्या महिन्यात भरपूर सुट्ट्या मिळणार असल्याने तुम्ही बाहेर फिरायला जाण्याचा बेत आखत असालच. मात्र तुम्हाला सुट्ट्यांच्या दिवशी घरी बसून वेळ घालवण्यापेक्षा बाहेर फिरायला जा. त्यामुळे नेहमीच्या कामांपासून रिलॅक्स वाटेल. जर तुम्ही योग्य डेस्टिनेशच्या शोधात असल्यास या ठिकाणांना जरुर भेट द्या.

वेलास व्हिलेज, रत्नागिरी

महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर वसलेल्या रत्नागिरीत वेलास गाव खासकरुन मासेमारीसाठी प्रसिद्ध आहे. मुंबई पासून जवळजवळ 220 किमी अंतर तरुन गेल्यावर तुम्ही येथे पोहचू शकता. या गावातील घरे खासकरुन पारंपरिक पद्धतीने उभारण्यात आलेली आहेत. तर वेलास बीच या गावातील घरांना अनोखे रुप देण्याचे काम करतो. मार्च महिन्यात या ठिकाणी जाण्याचे मुख्य कारण म्हणजे येथे कासवांशी संबंधित खास फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात येते. आजूबाजूला पाहण्यासारखी ठिकाणे म्हणजे हरिहरेश्वर बीच, केलसी बीच, व्हिक्टोरिया फोर्ट, दिवागर बीच आणि मुरुड या स्थळांना ही तुम्हाला भेट देता येणार आहे.

लक्षद्वीप

लक्षद्वीप म्हणजे शांतता आणि समुद्राचे नीळेशार पाणी पाहून मन प्रसन्न होते. मार्च महिन्यात येथील वातावरण खुप उत्तम असते. मात्र पावसाळ्यात येथील काही बीच बंद केले जातात. जर तुम्हाला नीळ्याशार समुद्रात पोहायचे मन करत असेल तर नक्की या ठिकाणी भेट द्या. मिनीकोय आयलँड,अगाती आयलँड, बंगाराम,कदमत, अंदमान ही येथे ही तुम्हाला भेट देता येईल.

हॅवलॉक आयलँड, अंदमान

फेब्रुवारी ते मार्च महिन्यात अंदमान येथे फिरण्यासाठी उत्तम पर्याय आहे. शांती आणि रिलॅक्सेशनसाठी येथील वातावरण, समुद्र हे या आयलँडला विशेष रुप देतात. त्याचसोबत स्कुबा डायव्हिंगसाठी सुद्धा येथे मार्च महिना चांगला असल्याचे सांगितले जाते. जर तुम्हाला या ठिकाणासह अन्य ठिकाणांना भेट द्यायची असेल तर राधानगर बीच,एलिफंट बीच.सीतापुर बीच,विजय नगर बीच आणि कालापत्थर बीच येथील मनमोहक नजारे पाहायला मिळतील.

कुर्ग

कुर्ग येथील थंड हवामान वर्षभर असल्याने तेथे जाण्यात एक वेगळाच आनंद भेटतो. मार्च महिन्यात या ठिकाणी स्टॉर्म फेस्टिव्हलचे आयोजन केले जाते. यावेळी कुर्ग येथील तापमान 10 ते 40 अंश पेक्षा जास्त नसते. अबे फॉल्स,नागरहोल नॅशनल पार्क,वायनाड वाईल्डलाईफ सेंचुरी, दुबारे एलिफंट कँम्प या ठिकाणांवरही तुम्ही फिरायला जाऊ शकता.

त्यामुळे आजच तुमच्या मार्च महिन्याच्या सुट्ट्यांचा बेत या ठिकाणी जाण्यासाठी आखा. त्याचसोबत आपल्या मित्रमैत्रीणी किंवा परिवारासह येथे जरुर फिरायला जाऊन सुट्ट्यांचा आनंद घ्या.