Renting Challenges In Mumbai (Photo Credit : linkedin)

Cost Of Living In Mumbai: शहरातील गगनाला भिडणारे भाडे (Mumbai Renting) आणि घरमालकांच्या कडक अटी, शर्थींमुळे मुंबईत राहण्यासाठी परवडणारी आणि आरामदायी जागा शोधणे हे एक कठीण काम (Renting Challenges In Mumbai) होऊन बसले आहे. बऱ्याच लोकांसाठी, विशेषत: कामासाठी स्थलांतरित झालेल्या लोकांसाठी. या शहरात खिशाला परवडेल अशा किमतीमध्ये घर शोधणे म्हणजे अग्नीदिव्यच जणू. आपल्या कामाच्या ठिकाणी भाड्याने घर उपलब्ध न होण्याचा मुंबई शहरात इतका अतिरेक झाला आहे की, लोक पर्याय म्हणून हॉटेलमध्ये (Mumbai Hotels) खोली भाड्याने बुक करु लागले आहेत. LiveMint मधील पर्सनल फायनान्सचे संपादक नील बोराटे, यांनी असाच एक अनुभव सोशल मीडियावर शेअर केला. ते नियमितपणे कामासाठी पुण्याहून मुंबईला ये-जा जातात. भाड्याचा त्रास टाळण्यासाठी, बोराटे शहरात राहण्याच्या काळात हॉटेल आणि एअरबीएनबीमध्ये राहणे निवडतात.

नील बोराटे यांनी पुणे आणि मुंबई प्रवासादरम्यान राहण्याचा अनुभव लिंक्डइन पोस्टमध्ये नुकताच शेअर केला. ते म्हणाले, "प्रत्येक आठवड्यात, मी माझा वेळ पुणे (माझे घर) आणि मुंबई (कामासाठी) मध्ये व्यतीत करतो. नेहमीच्या प्रवासादरम्यान मुंबईमध्ये भाड्याने घर घेऊन राहणे हे मी सोडून दिले आहे. त्याऐवजी मी Airbnbs आणि हॉटेल्समध्ये राहणे पसंत करतो. कारण कमी भाड्यामध्ये घर मिळणे, त्यासाठी घरमालकांशी घासाघीस करणे हे प्रचंड वेळखाऊ आणि मनस्ताप देणारे आहे", असे बोराटे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये स्पष्ट केले. (हेही वाचा, Mumbai Ring Roads: लवकरच मुंबईकरांना वाहतूक कोंडीपासून मिळणार दिलासा! शहराभोवती बांधले जाणार 5 रिंग रोड, जाणून घ्या मार्ग)

दक्षिण मुंबईतील पसंतीची हॉटेल्स

बोराटे यांनी दक्षिण मुंबईतील हॉटेल्सच्या जुन्या-जागतिक आकर्षणाबद्दल त्यांची आवड व्यक्त केली. त्यासोबत त्यांनी त्यांच्या प्रमुख तीन पर्यायांची यादी केली: द सी ग्रीन हॉटेल, द स्ट्रँड आणि द वेस्टेंड हॉटेल. त्यांच्या मते, ही हॉटेल्स आकर्षक विंटेज वातावरण देतात. परंतू त्यामध्ये जिम किंवा पूल यांसारख्या आधुनिक सुविधांचा अभाव आहे. या हॉटेल्समध्ये राहण्याची किंमत प्रति रात्र सुमारे 5,000 रुपयांपासून सुरू होते. बोराटे पुढे सांगतात, "तुम्ही ही हॉटेल्स बुक करताना आधुनिक हॉटेल्सच्या अपेक्षेने येऊ नका. तुम्हाला की कार्ड्सऐवजी मेटल की मिळण्याची शक्यता आहे. त्याऐवजी उत्तम स्थान आणि इतिहासाचा आनंद घ्या." (हेही वाचा, Hacking Risk In India: कर्मचार्‍यांकडून नोंदणी न केलेल्या उपकरणांच्या वापरामुळे हायब्रीड कामात वाढली जोखीम)

भाड्याचे घर विरुद्ध हॉटेलमधला मुक्का: खर्चाचे काय?

आपल्या पोस्टनंतर टिप्पणी विभागात आलेल्या प्रश्नांचे उत्तर देताना त्यांनी आपल्या निर्णयामागची आर्थिक बाजूही स्पष्ट केली. हॉटेलच्या मुक्कामावर ते दरमहा एक लाख खर्च करतात का? असे विचारले असता, त्यांनी स्पष्ट केले की, ते हॉटेल आणि एअरबीएनबीच्या संयोजनावर महिन्याला सुमारे 40,000 रुपये खर्च करतात, जे मुंबईतील 1 BHK च्या भाड्याच्या तुलनेत बरोबर आहे. ते पुढे सांगतात, “मी आठवड्यातून सुमारे 2 रात्री मुंबईत घालवतो. नेहमी हॉटेल्समध्ये नाही-कधीकधी Airbnbs मध्ये अर्ध्या किमतीत. त्यामुळे मी हॉटेलवर महिन्याला एक लाख खर्च करत नाही. कदाचित 40 हजार इतका खर्च होतो, जो जे 1 BHK भाड्याच्या जवळपास सारखाच असल्याचे ते म्हणाले.

मुंबईत भाड्याच्या घराला पर्याय

स्थलांतरीत नोरकरदारांमध्ये नवा ट्रेण्ड

बोराटेंचा निर्णय शहरांमध्ये प्रवास करणाऱ्या आणि घर दीर्घकालीन भाड्याने घेण्याऐवजी तात्पुरत्या निवासस्थानांमध्ये राहण्याच्या नव्या ट्रेण्डला प्राधान्य देते. जो हायब्रीड कामगारांमधील वाढती आणि नवी लवचीकता प्रवृत्ती प्रतिबिंबित करतो.