Analiza Daran De Guzman Mobile photography, (Ants Drink Water) | (Photo Credits: Facebook)

क्रेडिट गोज टू 'मुंग्या पाणी कसं पितात' हे शिर्षक वाचून आपणास कदाचित काहीसे विचित्र वाटू शकतं. पण, खरोखरच अशी घटना घडली आहे. मोबाईल फोटोग्राफी छंद जोपासणाऱ्या एका महिलेने पाणी पिणाऱ्या मुगीची छायाचित्र काढून एक आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकली आहे. अ‍ॅनालिझा दारन दी गुझमॅन (Analiza Daran De Guzman) असे या महिलेचे नाव आहे. ती एक Filipino photographer (फिलीपींस फोटोग्राफर) आहे. तिने केवळ मोबाईल द्वारे काढलेले फोटो केवळ सुंदरच नव्हे तर थक्क करणारे आहेत. तिच मोबाईल फोटोग्राफी (Mobile Photography) पाहून तिच्यावर जगभराती कौतुकाचा वर्षाव होतो आहे.

टेक्नोलॉजी डॉट इक्युरियर डॉट नेटसह जगभरातील विविध प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, Analiza Daran De Guzman हिने खरोखरच पाणी पिणाऱ्या मुंग्यांचे फटो काढले. तिने हे सुंदर फोटो Binangonan येथील आपल्या निवासस्थानी काढले होते.

Analiza Daran De Guzman Mobile photography, (Ants Drink Water) | (Photo Credits: Facebook)

दरम्यान, अ‍ॅनालिझा दारन दी गुझमॅन हिने जी आंतरराष्ट्री स्पर्धा चिंगली तिचे नाव #Water2020 असे होते. जी एप्रिल 2020 मध्ये आयोजित करण्यात आली होती.

Analiza Daran De Guzman Mobile photography, (Ants Drink Water) | (Photo Credits: Facebook)

फोटो शेयरींग साईट Agora द्वारा ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत अ‍ॅनालिझा दारन दी गुझमॅन हिला प्रथम पुरस्कार मिळाला. या पुरस्काराच्या रुपात तिला 1 हजार डॉलर (सुमारे 75000 रुपये) रोख मिळाले. (हेही वचा, Pulitzer Prize 2020: डार यासीन, मुख्तार खान, चन्नी आनंद पुलित्जर पुरस्कार 2020 ने सन्मानित)

Analiza Daran De Guzman Mobile photography, (Ants Drink Water) | (Photo Credits: Facebook)

अ‍ॅनालिझा दारन दी गुझमॅन हिच्याविषयी सांगायचे तर Analiza ही तीन मुलांची आई आहे. तिला फॅशन फोटोग्राफीचाही छंद आहे. तसेच ती Palawan येथील Coron मध्ये आपल्या कुटंबासह ती एक ट्रॅव्हल एजन्सी आणि हॉटेलही चालवते.

तीने काढलेले सर्व फोटो हे स्मार्टफोनच्या माध्यमातून काढले आहेत. तिने फोटोग्राफी डीएसएलआरवर शिकली.

Analiza Daran De Guzman Mobile photography, (Ants Drink Water) | (Photo Credits: Facebook)

2016 मध्ये एका ट्रीपदरम्यान तिचा डीएसएलआर खराब झाला. त्यानंतर ती एका ऑनलाईन फोटोग्राफी ग्रुपचा भाग बनली आणि क्लिप ऑन मायक्रो लेन्सेस बद्धल तिला माहिती झाले.

विशेष म्हणजे मुंगी पाणी पितानाचे फोटो काढताना अ‍ॅनालिझा दारन दी गुझमॅन हिने ट्रायपॉडही वापरले नाही. ती सांगते की मुंग्या वेगाने धावतात. त्यामुळे त्यांना पाणी पिताना टीपणे एक आव्हानात्मक काम आहे. दरम्यान, Analiza आपल्या कामाबद्दल विशेष खुष आहे. मुंग्यांचा पाणी पितानाचा फोटो काढणे हा तिच्या आयुष्यातील सुंदर क्षणांपैकी एक क्षण असल्याचे ती मानते. हे फोटो काढण्यासाठी तिला 4 तास इतका कालावधी लागला.