Lakshadweep Travel Guide: लक्षद्वीपला भेट देण्याचा विचार करत आहात? जाणून घ्या कसे जाल, योग्य वेळ आणि काय पाहाल
Lakshadweep Travel Guide 9photo credit ; pixabay0

Lakshadweep Vacation Guide: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच लक्षद्वीप (Lakshadweep) बेटांना भेट दिली होती. त्यानंतर सध्या देशात या केंद्रशासित प्रदेशाचे नाव चर्चेत आहे. पंतप्रधानांचे फोटो पाहून अनेक लोकांनी लक्षद्वीपला भेट देण्याची योजना आखली आहे. जर तुम्हीही लक्षद्वीपला जाण्याचा विचार करत असाल तर हा लेख तुम्हास उपयुक्त ठरू शकतो. या लेखात आम्ही लक्षद्वीप बेटांबद्दल काही उपयुक्त माहिती देत आहोत.

तर लक्षद्वीप हा भारतातील आठ केंद्रशासित प्रदेशांपैकी सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश आहे. हा अरबी समुद्रातील 36 बेटांचा एक समूह आहे. नैसर्गिक लँडस्केप, वालुकामय किनारे, भरपूर वनस्पती आणि प्राणी, सीफूड आणि धावपळीच्या जीवनशैलीचा अभाव ही लक्षद्वीपची वैशिष्ठ्ये.

तर इथे 36 पैकी फक्त 10 बेटांवर लोक राहतात. येथील 96 टक्के लोकसंख्या मुस्लिम आहे. लक्षद्वीपची राजधानी कावरत्ती आहे. 2011 च्या जनगणनेनुसार, लक्षद्वीपची एकूण लोकसंख्या 64473 आहे.

लक्षद्वीप कुठे आहे?

लक्षद्वीप बेटे ही केरळमधील कोची शहरापासून 220 ते 440 किमी अंतरावर पन्ना अरबी समुद्रात आहेत.

कधी भेट द्याल?

लक्षद्वीपमध्ये उष्णकटिबंधीय हवामान आहे आणि त्याचे सरासरी तापमान 27°C - 32°C आहे. इथे एप्रिल आणि मे हे सर्वात उष्ण असतात. पावसाळ्यात हवामान समतोल असल्याने जहाजावर आधारित पर्यटन बंद असते. ऑक्‍टोबर ते मार्च हा बेटांवर जाण्‍यासाठी उत्तम काळ आहे. जून ते ऑक्टोबर या काळात दक्षिण-पश्चिम मान्सून सक्रिय असतो.

कसे जाल?

लक्षद्वीप बेटावर जहाज आणि विमानमार्गाने पोहोचला येते. सर्व पर्यटन उद्देशांसाठी कोची हे लक्षद्वीपचे प्रवेशद्वार आहे.

कोचीहून विमानाने अगाट्टी आणि बंगाराम बेटांवर पोहोचता येते. या विमानतळावरुन तुम्ही लक्षद्वीपमधील मिनिकॉय, काल्पेनी आणि इतर बेटांवरील प्रवास करु शकता. (हेही वाचा: MakeMyTrip 'Beaches of India' Campaign: पीएम मोदींच्या भेटीनंतर मेक माय ट्रीपवर लक्षद्वीपबाबतच्या सर्चमध्ये 3400% वाढ; कंपनीने सुरु केली 'बीचेस ऑफ इंडिया' मोहीम)

जलमार्गाने प्रवास करण्यासाठी कोचीहून सात प्रवासी जहाजे उपलब्ध आहेत. प्रवासासाठी निवडलेल्या बेटानुसार यातील एक जहाज तुम्ही निवडू शकता. या पॅसेजला 14 ते 18 तास लागतात.

काय पाहाल?

लक्षद्वीपमध्ये आगत्ती, कदमत, मिनिकॉय बेट, काल्पेनी बेट आणि कावरत्ती बेट लोकप्रिय ठिकाणे आहेत. या ठिकाणी तुम्ही निसर्ग आणि समुद्र किनाऱ्यांचा आनंद घेऊ शकता. या ठिकाणी तुम्ही स्नॉर्कलिंग, स्कूबा डायव्हिंगसह अनेक प्रकारच्या साहसांचा आनंद घेऊ शकता. या ठिकाणी नाईटलाइफ किंवा खरेदीसाठी काहीही पर्याय नाहीत.

दरम्यान, तुम्ही भारतीय जरी असला तरीही लक्षद्वीपमध्ये प्रवास करण्यासाठी तुम्हाला परवानगीची आवश्यकता असते. हे परमिट तुम्हाला लक्षद्वीपच्या अधिकृत वेबसाईटवर मिळू शकते. लक्षद्वीपचे मुख्य आकर्षण म्हणजे त्याचे अप्रतिम सौंदर्य. लक्षद्वीप हे सागरी जीवनाचे आश्रयस्थान आहे. त्यामुळे दैनंदिन जीवन, फोन, तंत्रज्ञान यांपासून दूर शांतपणे वेळ व्यतीत करायचा असेल तर हे योग्य ठिकाण ठरेल.