MakeMyTrip 'Beaches of India' Campaign: नुकतेच पाताप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीपला भेट दिली. या भेटीचे काही छायाचित्रे त्यांनी सोशल मिडियावर शेअर केली होती. पंतप्रधान मोदींनी लक्षद्वीपला दक्षिण आशियातील पर्यटनाच्या केंद्रस्थानी आणले. यानंतर सर्वांचीच या बेटाबाबतची उत्सुकता वाढली आहे. आता ऑनलाइन ट्रॅव्हल कंपनी मेक माय ट्रीपने (MakeMyTrip) सोमवारी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर लक्षद्वीपसाठी प्लॅटफॉर्मवरील सर्चमध्ये 3400% इतक्या मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. कंपनीने X वर एका पोस्टमध्ये याबाबत माहिती दिली आहे.

पंतप्रधान मोदींच्या लक्षद्वीप दौऱ्यावर मालदीवच्या खासदाराच्या वक्तव्याबाबत सुरु असलेल्या वादामध्ये, मेक माय ट्रीपचे मुख्य विपणन आणि व्यवसाय अधिकारी राज ऋषी सिंग म्हणतात, 'लक्षद्वीपमध्ये पंतप्रधानांच्या भेटीपासून प्लॅटफॉर्मवर शोधांमध्ये उल्लेखनीय 3400% वाढ झाली आहे. यामुळे आम्हाला 'बीच ऑफ इंडिया' मोहीम सुरु करण्याची प्रेरणा मिळाली. या अंतर्गत ग्राहकांना भारतातील समुद्रकिना-यांची माहिती मिळू शकते. आम्ही या अंतर्गत उल्लेखनीय सवलत देखील देत आहोत...' (हेही वाचा: PM Narendra Modi Goes Snorkelling in Lakshadweep: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीपमध्ये घेतला स्नॉर्कलिंगचा आनंद; शेअर केले आपल्या 'उत्साही अनुभवाचे’ फोटो)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)