राष्ट्रवादीचे लक्षद्वीपचे खासदार मोहम्मद फैजल यांना बुधवारी लोकसभेतून अपात्र ठरवण्यात आले. याआधी मोहम्मद फैजल यांना केरळ उच्च न्यायालयाकडून झटका बसला होता. केरळ उच्च न्यायालयाने खुनाच्या प्रयत्नाच्या खटल्यातील त्यांची शिक्षा स्थगित करण्याची त्यांची याचिका फेटाळली. यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने केरळ उच्च न्यायालयाचा शिक्षेला स्थगिती देण्याचा निर्णय फेटाळला होता. सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण केरळ उच्च न्यायालयात परत पाठवले होते. फैजल यांना लोकसभा सदस्य म्हणून अपात्र घोषित करण्याची ही दुसरी वेळ आहे. (हेही वाचा: Sanjay Singh Raided by ED: दिल्ली दारू पॉलिसी प्रकरणी आप खासदार संजय सिंह यांच्या दिल्लीतील घराची झडती)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)