परदेशात फिरायला जाण्याची संधी मिळणे हे अनेकांचे स्वप्न असते. परंतु आर्थिक चिंतेमुळे सर्वांनाच परदेशात प्रवास करता येत नाही. जर तुम्हालाही स्वस्तात परदेशात प्रवास करायचा असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आयआरसीटीसीने (IRCTC) ने थायलंडला भेट देण्यासाठी एक अप्रतिम टूर पॅकेज आणले आहे.
याद्वारे तुम्हाला जगातील एका लोकप्रिय पर्यटन स्थळाला भेट देण्याची संधी मिळेल. या टूर पॅकेजमध्ये तुम्हाला खाण्यापिण्याची आणि राहण्याची काळजी करण्याची गरज नाही. याची संपूर्ण जबाबदारी आयआरसीटीसीने घेतली आहे. याशिवाय, पॅकेजमध्येच तुम्हाला एक मार्गदर्शक देखील प्रदान केला जाईल.
हे थायलंड टूर पॅकेज आयआरसीटीसीने खासकरून मुंबईकरांसाठी डिझाइन केले आहे. हा 4 रात्री 5 दिवसांचा दौरा आहे. येत्या 28 ऑक्टोबरला ही टूर सुरु होणार आहे. यावेळी तुम्ही मुंबई ते बँकॉक आणि नंतर बँकॉक ते पट्टाया असा प्रवास करू शकता. यासाठी बुकिंग सुरू करण्यात आले आहे. पॅकेज दरम्यान, तुमची 3 स्टार हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
IRCTC Thailand Tour-
View the awe-inspiring Treasures of #Thailand ex #mumbai (WMO033) starting on 28.10.2023.
Book now on https://t.co/C2svgGuygY#Travel pic.twitter.com/t8Vh0kvQXs
— IRCTC (@IRCTCofficial) September 19, 2023
पट्टायामध्ये तुम्हाला कोरल आयलंड, अल्काझार शो पाहायला मिळेल. याशिवाय तुम्हाला बँकॉकमधील मंदिरे इत्यादी अनेक ठिकाणी भेट देण्याची संधी मिळेल. या पॅकेजमध्ये तुम्हाला प्रत्येक ठिकाणी भेट देण्यासाठी एसी बस आणि इंग्रजी भाषिक टूर गाइड मिळेल. प्रवाशांना घेऊन जाणारे एक विशेष विमान 28 ऑक्टोबरला मुंबई विमानतळावरून उड्डाण करणार आहे. विमानातील प्रवाशांची संख्या 35 निश्चित आहे. (हेही वाचा: New IRCTC Customer Care Helpline: आयआरसीटीसी कडून नवा हेल्पलाईन नंबर जारी; एकाच नंबर वर मिळणार देशभर मदत)
आता टूर पॅकेजची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे याची किंमत. तर यासाठी एकट्याने टूर प्लॅन केल्यास 67,300 रुपये व दोन लोकांना 58,900 रुपये प्रति व्यक्ती मोजावे लागतील. एखादे मूल सोबत असेल तर त्याचा खर्च वेगळा आकारला जाईल. अधिक माहितीसाठी, आयआरसीटीसी वेबसाईटला भेट देऊ शकता. यासह जवळच्या कार्यालयात जाऊन पॅकेजची माहिती प्राप्त करता येईल.