Indian Railways AC Travel | (Photo Credits-Twitter)

भारतीय रेल्वे (Indian Railways) प्रवाशांसाठी एक खूशखबर घेऊन आली आहे. रेल्वे प्रवाशांना आता स्वस्त दरात वातानुकूलीत रेल्वे प्रवास (Air-Conditioned Train Travel) करता येणार आहे. रेल्वेने एसी थ्री इकॉनॉमी क्लास (AC Three Economy Class) लॉन्च केला आहे. याचे प्रवासभाडे थर्ड एसी पेक्षा 8% स्वस्त असणार आहे. पहिल्या इकॉनॉमी क्लास डब्यातून 6 डिसेंबरपासून प्रयागराज ते जयपूर असा प्रवास करता येणार आहे. या कोचमध्ये प्रत्येक बर्थवर टेबल ते रीडिंग लाईट पर्यंत अशा विविध सेवा पुरवल्या जाणार आहेत. त्यासाठी विशेष कोचचीही पूर्तता करण्यात येणार आहे.

रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, एसी थ्री टियर इकोनॉमी क्लासच्या कोचचे भाडे विद्यमान ध्री एसी कोचच्या तुलनेत 8% कमी असणार आहे. म्हणजेच कमी पैशात प्रवासी अधिक चांगली यात्रा करु शकतात. लालू प्रसाद यादव हे रेल्वेमंत्री असताना त्यांनी गरीब रथ लॉन्च केला होता. आता आता गरीब रथ असलेली जुन्या डब्यांची रेल्वे हटवून त्या ठिकाणी अत्याधुनिक सेवा देण्याचा रेल्वेचा मानस आहे.

ट्विट

प्राप्त माहितीनुसार, हे कोच बर्थ वजनाला हलके परंतू मजबूत असणार आहेत. प्रत्येक बर्थवर स्नॅक्स टेबल असणार आहे. तसेच, फायर अलार्मचीही व्यवस्था असणार आहे. दिव्यांगांसाठी मोठे दरवाजे असणार आहेत. जेणेकरुन व्हील चेअरही आतघेता येऊ शकेल. चार्जिंगसाठीही व्यवस्था असणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या बर्थमथ्ये रीडिंग लाईटही असणार आहे. तसेच, बर्थमध्ये चढण्यासाठी शीड्याही असणार आहेत.