Byculla Zoo Re-Open: भायखळा येखील राणीची बाग येत्या 22 ऑक्टोंबर नंतर नागरिकांसाठी खुली करण्याचा विचार अधिकाऱ्यांकडून केला जात आहे. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गेल्या महिन्यात ट्विट करत असे म्हटले होते की, येत्या 22 ऑक्टोंबर पासून नाट्यगृहे आणि सिनेमागृह सुरु करण्यास परवानगी असणार आहे. अशातच आता वीरमाता जीजाबाई भोसले उद्यान आणि झू सुरु करण्याकडे लक्ष दिले जात आहे.(Tejas Thackeray यांचे नवे संशोधन, मुंबईत आढळली 'ईल' माशाची नवी रक्तवर्णीय प्रजाती, नाव ठेवले 'Rakthamichtys Mumba')
राणीची बाग सुरु झाल्यानंतर तेथे काही आकर्षणात्मक गोष्टी नागरिकांना पहायला मिळणार आहे. त्यामध्ये मुख्य म्हणजे दोन नवे हॅम्बोल्ट पेंग्विन तेथे असणार आहेत. त्याचसोबत सिद्धार्थ गार्डन आणि औरंगाबाद येथून 2020 मध्ये शक्ती आणि करिश्मा या रॉयल बंगालच्या वाघिणींना ही तेथे आणण्यात आले आहे. राणीची बाग कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर 15 फेब्रुवारी 2021 रोजी सुरु करण्यात आली होती. मात्र दुसऱ्या लाटेमुळे ती पुन्हा एकदा बंद केली गेली.(Hermit Crab: हार्मीट खेकडा, समुद्रातील प्लास्टिक प्रदुषणाकडे होतोय लैंगिकदृष्ट्या आकर्शित)
Tweet:
आम्ही प्रथमच उलगडत आहोत;
मुंबईची, महाराष्ट्राची आणि पर्यायाने संबंध भारताची शान असलेल्या, मुंबईचा ऐतिहासिक वारसा जपणाऱ्या, मुंबईतील एकमेव उद्यान आणि प्राणीसंग्रहालय असणाऱ्या राणीच्या बागेचा १५० वर्षांहून अधिक जुना इतिहास! pic.twitter.com/DKDxD9WIri
— The Mumbai Zoo (@TheMumbaiZoo) August 14, 2021
राणीबागेचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी असे म्हटले की, नागरिकांसाठी हे झू सुरु करण्याचा विचार केला जात आहे. त्यामुळे नागरिकांकडून आम्हाला वारंवार राणीची बाग कधी सुरु केली जाईल असे प्रश्न विचारले जात आहेत. अशातच 22 ऑक्टोंबर नंतर राणीची बाग सुरु करण्याचा निर्णय घेतला जाईल असे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. त्याचसोबत झू एकदा सुरु केल्यानंतर तेथे कोरोनाच्या नियमांचे पालन करुनच प्रवेश दिला जाणार आहे.