Bharat Gaurav Tourist Train: भारतीय रेल्वे CSMT येथून चालवणार भारत गौरव पर्यटक ट्रेन; अनुभवायला मिळणार भारताचा समृद्ध सांस्कृतिक आणि धार्मिक वारसा
IRCTC (PC - Facebook)

‘देखो अपना देश’ (Dekho Apna Desh) आणि ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ (Ek Bharat Shreshtha Bharat) उपक्रमांना चालना देण्यासाठी, भारतीय रेल्वे, आयआरसीटीसीच्या (IRCTC) सहकार्याने, भारत गौरव टुरिस्ट ट्रेन (Bharat Gaurav Tourist Train) सुरू करणार आहे. येत्या 17 नोव्हेंबर 2023 रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ही ट्रेन मार्गस्थ होणार आहे. मुंबई, पुणे, सोलापूर, गुंटकल, रेनिगुंटा, रामेश्वरम, मदुराई, कन्याकुमारी, कोचुवेली यांसारखी अनेक ठिकाणांचे दर्शन घेऊन 25 नोव्हेंबर 2023 रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ही ट्रेन परत येईल.

या ट्रेनमध्ये इकॉनॉमी, कम्फर्ट आणि डिलक्स पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या ट्रेनचा आणि यात्रेचा उद्देश देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पर्यटकांना भारताचा समृद्ध सांस्कृतिक आणि धार्मिक वारसा दाखवणे हा आहे. बोर्डिंग आणि डिबोर्डिंगच्या थांब्यांमध्ये ठाणे, पुणे, सोलापूर, कन्याकुमारी आणि इतरही काही प्रमुख स्थानकांचा समावेश आहे. ‘

‘देखो अपना देश’ आणि ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या उदात्त पर्यटन संकल्पनांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने, भारत सरकारच्या कल्पनेनुसार, रेल्वे मंत्रालय देशाच्या विविध भागांतून भारत गौरव पर्यटक गाड्या चालवत आहे. हे आयआरसीटीसी टुरिस्ट ट्रेन एक सर्वसमावेशक टूर पॅकेज असेल जे 3 पर्याय ऑफर करते- इकोनॉमी, कम्फर्ट आणि डिलक्स. यामध्ये ट्रेनचे भाडे, जेवण, मुक्काम आणि वाहतूक यांचा समावेश आहे. (हेही वाचा: Thailand Waives Visas for Indians: भारतीय प्रवाशांसाठी खुशखबर! आता थायलंडला जाण्यासाठी व्हिसाची आवश्यकता नाही, जाणून घ्या सविस्तर)

दरम्यान, इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनने डिसेंबरमध्ये दक्षिण भारताला भेट देण्यासाठी एक अद्भुत टूर पॅकेज आणले आहे. भारत गौरव टुरिस्ट ट्रेनचा हा दौरा 11 रात्री 12 दिवसांचा आहे. आयआरसीटीसीने या पॅकेजसाठी बुकिंगही सुरू केले आहे. पुढील महिन्यात हिवाळ्याच्या सुट्यांमध्ये दक्षिण भारताला भेट देण्यासाठी तुम्ही हे पॅकेज बुक करू शकता. मालदा टाउनपासून 11 डिसेंबर 2023 पासून प्रवास सुरू होणार आहे आणि तुम्हाला 22 डिसेंबर 2023 पर्यंत प्रवास करता येईल.