December 2018 Calendar : हे आहेत डिसेंबर महिन्यात साजरे होणारे सण आणि उत्सव
डिसेंबर 2018 (Photo Credits: Facebook)

December 2018 Calendar : नोव्हेंबर महिन्यामध्ये दिवाळी, छट पूजा, कार्तिक पौर्णिमा आणि तुळसी विवाह असे अनेक मोठे उत्सव साजरे केल्यानंतर, आता इंग्रजी कॅलेंडरनुसार डिसेंबर महिना सुरू होणार आहे, जो वर्षाचा सर्वात शेवटचा महिना आहे. हिंदू पंचांगानुसार हा मार्गशीर्ष महीना असेल. वर्षाच्या शेवटच्या महिन्यात नवीन वर्षाचे स्वागत आणि नवीन उत्सवांची तयारी सुरू होते. याच महिन्यात ख्रिसमस, दत्त पोर्णिमा यांसारखे उत्सव साजरे केले जातात. या महिन्यात तुम्ही जर का कुटुंबासोबत बाहेर फिरायला जाण्याचे नियोजन करत असाल तर अगदी उत्तम. कारण ख्रिसमस आणि नवीन वर्षाचे स्वागत यांमुळे तुम्ही तुमची ही सुट्टी यादगार बनवू शकता. चला तर पाहूया काय आहेत या महिन्यातील सण, उत्सव आणि सुट्ट्या -

डिसेंबर 2018 मध्ये साजरे केले जाणारे सण आणि उत्सव -

1 डिसेंबर 2018 (शनिवार) - कानजी अनला नवमी (ओडीसा)

3 डिसेंबर 2018 (सोमवार) - उत्पन्ना एकादशी, आळंदी यात्रा, हान्नुका, आंतरराष्ट्रीय अपंग दिवस

4 डिसेंबर 2018 (मंगळवार) - भौम प्रदोष

5 डिसेंबर 2018 (बुधवार) - मासिक शिवरात्री

6 डिसेंबर 2018 (गुरुवार) - दर्श अमावस्या, भारतरत्न डॉ. आंबेडकर पुण्यतिथी दिवस

7 डिसेंबर 2018 (शुक्रवार) – मार्गशीष अमावस्या

8 डिसेंबर 2018 (शनिवार) - मार्तंडभैरव षडरात्रोत्सवारं, देव दीपावली, चंद्रदर्शन

9 डिसेंबर 2018 (रविवार) - मुस्लिम रबि-उल-आखिर मासारंभ

11 डिसेंबर 2018 (मंगळवार) - विनायक चतुर्थी (अंगारक योग)

13 डिसेंबर 2018 (गुरुवार) - चंपाषष्ठी, स्कंदषष्ठी, मार्तंडभैरवोत्थापन, सुब्रह्मण्य षष्ठी (दक्षिण भारत)

15 डिसेंबर 2018 (शनिवार) - दुर्गाष्टमी, पारसी अमर्दाद मासारंभ

17 डिसेंबर 2018 (सोमवार) - धनुर्मासारंभ, पंचक समाप्ति

18 डिसेंबर 2018 (मंगळवार) - मोक्षदा एकादशी, गीता जयंती

19 डिसेंबर 2018 (बुधवार) – भागवत एकादशी (शुक्ल पक्ष), मौनी एकादशी, दानद्वादशी

20 डिसेंबर 2018 (गुरुवार) - प्रदोष (शुक्ल पक्ष)

21 डिसेंबर 2018 (शुक्रवार) - उत्तरायण, मार्गशीष पौर्णिमा प्रारंभ

22 डिसेंबर 2018 (शनिवार) - मार्गशीष पौर्णिमा (समाप्ति), श्रीदत्त जयंती

23 डिसेंबर 2018 (रविवार) - अयन करिदिवस

24 डिसेंबर 2018 (सोमवार) - भारतीय ग्राहक दिवस

25 डिसेंबर 2018 (मंगळवार) – ख्रिसमस-नाताळ, अंगारक संकष्ट चतुर्थी

26 डिसेंबर 2018 (बुधवार) - जोरमेला (पंजाब) प्रारंभ

28 डिसेंबर 2018 (शुक्रवार) - जोरमेला (पंजाब) समाप्ति

29 डिसेंबर 2018 (शनिवार) - कालाष्टमी

31 डिसेंबर 2018 (सोमवार) - पार्श्वनाथ जयंती (जैन)

यावर्षी ख्रिसमस मंगळवारी आल्याने तुम्ही सोमवारची सुट्टी घेऊन शनि-मंगळ फिरायला जाण्याचे नियोजन करू शकता.