पत्नीने पतीला धोका देण्याचं प्रमाण वाढतंय, जाणून घ्या यामागील नेमकं कारण आणि काय कराल उपाय?
| (Photo courtesy: archived, edited images)

पती पत्नीच्या पवित्र नात्यात तिसऱ्या 'वो'च्या वाढीव महत्वामुळे जोडीदार कोणा वेगळ्याच प्रियकरासोबत पळून गेल्याच्या घटना अगदी रोज समोर येत असतात .या प्रकारामुळे विश्वासावर उभ्या असलेल्या वैवाहिक नात्याला (Married Life) काळिमा फासला जातोय. याशिवाय नात्यातील आकर्षण दुर झाल्यावर संसार कंटाळवाणा वाटू लागतो आणि परिणामी ही नाती फक्त कागदोपत्री आणि नातेवाईकांना दाखवण्यापुरतीच मर्यादित राहतात.अनेकदा आपल्या जोडीदाराला धोका देणाऱ्यांमध्ये पुरुषांना दोषी धरलं जातं पण सध्याची परिस्थिती पाहता पत्नीने पतीला धोका (Wife Cheats On Husband) देण्याचे प्रमाण वाढलं आहे.

अलीकडेच झालेल्या एका सर्व्हेच्या नुसार 28 टक्के महिला या आपल्या नात्यात आनंदी नसल्याने विवाहबाह्य संबंधांना अधिक पसंती दर्शवतातर. या महिलांना आपल्या पतीला धोका देण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या तीन प्रमुख बाबी कोणत्या हे जाणून घ्या.. ... Gleeden Survey: भारतात दर दहा पैकी सात महिला पतीला धोका देत असल्याचं निरीक्षणात सिद्ध!

भावनिक संबंधाचा अभाव

घड्याळ्यावर पळत असताना आपण अनेकदा स्वतःकडे लक्ष द्यायला सुद्धा विसरून जातो अशा वेळी साहजिकच जोडीदाराकडे देखील दुर्लक्ष होत असणार. यामधून पत्नीला  एकटेपणा जाणवू शकतो. याचे प्रमाण वाढल्यास पुढे जाऊन भावनिक नातं कमकुवत व्हायला सुरवात होते. अशा वेळी एखादया बाहेरील पुरुषाकडून अधिक वेळ मिळत असल्यास या महिला त्याच्याकडे आकर्षित होतात, आपल्या पतीसोबतचे संबंध फार चांगले नसल्याने त्यांना आपण धोका देत असल्याची जाणीव होत नाही.

नात्यामध्ये आदराची कमतरता

अलीकडे महिला आपल्या घरासोबतच एक यशस्वी करिअरची देखील उभारणी करत असतात. पण काही बुरसट विचारांचे पती त्यांना घराच्या चौकटीत बांधून ठेवण्याचा प्रयत्न आकारतात .अनेकदा यामध्ये पतीच्या कुटुंबीयांचा दबाव अधिक असतो. अशा दबावामुळे महत्वकांक्षी महिलेला अपमानित वाटणे साहजिक आहे. यामुळे आपल्याला मान देऊ शकेल, आपल्या कामात मदत करू शकेल किंवा अगदीच नाही तर निदान प्रोत्साहन देऊ शकेल असा जोडीदार शोधण्याकडे त्यांचा कल असतो. यातून विवाहबाह्य संबंधांना खतपाणी मिळते.

शारीरिक संबंध कंटाळवाणे  झाल्यास..

वैवाहिक नातं हे मानसिक व भावनिक बाजूंसोबतच शारीरिक संबंधांनी देखील प्रभावित होतं असतं. अनेक महिलांना एकाच पार्टनर सोबत वारंवार शरीरसंबंध ठेवल्यावर कंटाळा येतो. अनेकदा आपला जोडीदार शारीरिक दृष्ट्या अनफिट असल्यावर आकर्षण कमी होतं व परिमाणी सेक्सलाईफ मधील उत्साह निघून जातो. अशा वेळी आपल्या शारीरिक गरजा पूर्ण करण्यासाठी त्या परपुरुषाकडे वळतात. Boaring Sex Life? शरीर संबंधाआधी महत्वाच्या आहेत या गोष्टी; जोडीदाराला खुश करण्यासाठी अशी करा तयारी

तुमच्या लग्नातील चार्म परत मिळवण्यासाठी करा हे उपाय

-पार्टनरशी बोला, बोलण्याने एकमेकांच्या समस्या समजून घेता येईल आणि मगच त्याच्यावर उपाय शोधायला मदत होईल

-स्वतःकडे लक्ष द्या, आपल्या जोडीदाराला आकर्षित करून घेण्यासाठी शक्यतो व्यवस्थित, टिप टॉप राहायचा प्रयत्न करा. आपल्या पेहारावामध्ये थोडेफार बदल करा.यातून तुमचे काहीही नुकसान होणार नाही उलट काहीतरी नात्यात नावीन्य येईल.

- निदान सुट्टीच्या दिवशी पार्टनर सोबत मिळून कुकिंग करणं , फिरायला जाणं किंवा घरीच बसून सिनेमा पाहण्यासारख्या गोष्टी एकत्र करा.

- तुमच्या पार्टनरशी सेक्सलाईफ बद्दल सुद्धा चर्चा करा,त्यांची गरज समजून उत्तम सेक्स केल्यास आकर्षण टिकून राहायला मदत होते.

- पार्टनरचा आदर करा

लग्नानंतर नात्यात अडचणी आल्यास अनेक महिला विवाहबाह्य संबंधांकडे  वळतात, पण याचा दोष केवळ त्यांच्या माथी लावणे उचित नाही , कोणत्याही नात्यात उणिव असल्याशिवाय असे पाऊल उचलले जात नाही मात्र या उणिवा वाढत गेल्यास छोटयाश्या भांडणाने देखील नाती तुटू शकतात, त्याआधीच योग्य तो उपाय करणे आवश्यक आहे.