नवी दिल्ली: पतीच्या त्रासाला कंटाळून पत्नीने आत्महत्या केली असे अनेक किस्से आजवर आपण ऐकले आहेत मात्र आता या त्रस्त पत्नीवर्गाने या समस्येवर वेगळाच तोडगा काढलाय. ग्लीडेंन (Gleeden) या प्रामुख्याने विवाहित लोकांसाठी डेटिंगचा पर्याय निर्माण केलेल्या ऍपच्या निरीक्षणात, भारतातील 10 पैकी 7 महिला या वैवाहिक वादांमुळे (Marital Issues) आपल्या जोडीदाराला चीट (Cheat) करून ऑनलाईन डेटिंग (Online Dating) कडे वळू लागल्याचं उघड झालंय. या सर्वेक्षणात घरात वेगवेगळ्या कारणाने सतत वाद होत असतात शिवाय संसाराला बरीच वर्षे झाल्यामुळे एकसुरी पणा जाणवतो अशी कारण देऊन महिलांनी डेटिंग ऍप (Dating App) हा पर्याय निवडल्याचं सांगितलं जातंय.
भारतात बेंगलोर, मुंबई, कोलकाता या मुख्य शहरात प्रसिद्ध असणाऱ्या या ऍपचे आज पाच लाखाहूनही अधिक युजर्स आहेत यामध्ये 20 टक्के पुरुष व 13 टक्के महिला युजर्स आहेत.साधारण 34 ते 49 वयोगटातील 77 टक्के महिला हा पर्याय वापरतायत. डेटिंग अॅपवर चॅट करताना या '4' गोष्टी बोलणे टाळा !
या मागील कारण शोधण्यासाठी एक सर्वेक्षण ग्लीडेंन (Gleeden) तर्फे घेण्यात आले होते. या मध्ये संसारात साथीदाराचे दुर्लक्ष, घरगुती कामात मदत न करणं या मुळे आनंदी जीवन जगता येत नाही असं सांगण्यात आलं होतं. अनेकदा दबावात येऊन लग्न केलेल्या होमोसेक्शुअल (Homo-Sexual) लोकांसाठी आपल्या आवडीचा जोडीदार या माध्यमातून मिळाला आहे. यापैकी अनेकांना हा पर्याय निवडून आपल्या साथीदाराला धोका दिल्याचा अजिबात खेद वाटत नाही.
याशिवाय ग्लीडेंन (Gleeden)च्या वापरकर्त्या दहा पैकी चार महिलांनी, अज्ञात लोकांसोबत या माध्यमातून फ्लर्ट केल्याने त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात सकारात्मक बदल झाल्याचं देखील सांगितलं आहे. या शिवाय या ऍपच्या वापरानंतर त्यांच्या विटाळ आयुष्यात नवीन पालवी निर्मण झाल्याचे या महिला म्हणतात अशी माहिती ग्लीडेंन (Gleeden)चे मार्केटिंग तज्ज्ञ सोलॅन पेल्लेट यांनी दिली.
हा ऍप 2009 ला फ्रान्समध्ये लाँच करण्यात आला होता ज्यानंतर 2017 मध्ये भारतात देखील हा ऍप लाँच करण्यात आला. सरासरी लग्नांमध्ये अभाव असलेली सुरक्षा, गुप्तता आणि जवळीक या गोष्टी हे ऑनलाईन पार्टनर्स पुरवत असल्याने काहीच दिवसात याला मोठा युजर वर्ग तयार झाला आहे.