
डेटिंग विश्वातही अॅप्सचे आगमन झाल्याने डेटिंगच्या व्याख्या थोड्या बदलल्या आहेत. त्यामुळे डिजिटल डेटिंगच्या जमान्यात अप्रोचही बदलणे गरजेचे आहे. डेटिंग अॅपवर चॅट करताना काही विशिष्ट गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. पण अनेकदा उत्सुकतेपोटी किंवा कधी नाराज झाल्याने भावना चटकन व्यक्त केल्या जातात. मात्र त्यामुळे नाते पुढे जाण्यास काही अडथळे येऊ शकतात. म्हणूनच ऑनलाईन डेट करताना या चूका करणे टाळा....
खूप सुंदर दिसतेस
डेटिंग अॅपवर चॅट करताना जेव्हा एखादी मुलगी तुम्हाला सुंदर वाटते तेव्हा लगेचच तिची स्तुती करु नका. कारण असे केल्याने गैरसमज होऊन ती मुलगी तुम्हाला नकार देऊ शकते. सौंदर्याऐवजी तुम्ही तिचे ट्रॅव्हल फोटोज, करिअर चॉईस किंवा स्टाईल सेंसचे कौतुक करु शकता.
राग व्यक्त करु नका
चॅट करताना समोरुन एखाद्या प्रश्नाचे उत्तर न मिळाल्यास रागवू नका. त्याचबरोबर तुमची नाराजी, राग मेसेजद्वारे व्यक्त करु नका. समोरच्या व्यक्तीला त्याचे वाईट वाटू शकते.
सेक्सुअल मेसेजेस
डेटिंग अॅपवर मुलीशी सेक्सुअल बोलणे किंवा मेसेज करणे यामुळे तुमची प्रतिमा मलिन होऊ शकते. यामुळे तुम्हाला नकार पचवावा लागू शकतो. म्हणूनच असे मेसेज करणे टाळा. त्याऐवजी म्युझिक, फूड किंवा ट्रॅव्हलिंग अशा विषयांवर बोला.
कॉपी पेस्ट मेसेजेस
कॉपी पेस्ट मेसेजेस पाठवणे टाळा. कारण असे मेसेज चटकन लक्षात येतात आणि त्यामुळे नकार मिळण्याची शक्यता वाढते.