Boaring Sex Life? शरीर संबंधाआधी महत्वाच्या आहेत या गोष्टी; जोडीदाराला खुश करण्यासाठी अशी करा तयारी
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit : Youtube)

सेक्स (Sex), पती पत्नी मधील नाते वृद्धिंगत करणारी एक महत्वाची गोष्ट. नवीन लग्न झाल्यानंतर सुरुवातीच्या काळात निर्माण होणाऱ्या शारीरिक संबंधांवर नात्याची वीण गुंफत जाते. अथवा लग्नाला काही वर्षे झाल्यावर जेव्हा तुम्ही परत तुमची सेक्सलाईफ (Sex Life) जिवंत करण्याचा प्रयत्न करता त्यावेळचे शारीरिक संबंध तुम्हा दोघांना भावनिक आणि मानसिकरीत्याही जवळ आणतात. मात्र यासाठी तुमच्या दोघांमधील सेक्स हा दोघानांही हवाहवासा वाटणारा असला पाहिजे. यासाठी जेव्हा तुम्ही गॅप घेऊन परत सेक्स करता त्यावेळी काही गोष्टींची काळजी घेतली तर तुमचा जोडीदार नक्कीच खुश होईल.

वेळ – सर्वात महत्वाचे म्हणजे आपला जोडीदार कधी फ्री आणि रीलॅक्स मूडमध्ये असतो ते पाहून वेळ ठरवा. बरेचवेळा रात्री दिवसभराच्या कामामुळे थकून गृहिणींना आराम करायचा असतो आणि त्याच वेळी पुरुषांना सेक्स हवा असतो. मात्र हे टाळा. शक्यतो पहाटेचा सेक्स हा सुखावनीय असतो.

वातावरण निर्मिती – वेळ आहे म्हणून अगदी कुठेही सेक्स करायच्या फंदात पडू नका. त्यासाठी आधी खोलीची रचना तशी करा. स्वच्छ रूम, नीटनेटका पलंग, मोहवणारे संगीत, आल्हाददायी सुगंध या गोष्टी स्त्रियांना आकर्षित करण्यास फायद्याच्या ठरतात.

शरीराची स्वच्छता – सेक्स आधी व्यवस्थित आंघोळ करा. ओरल सेक्स करायचा विचार असेल तर, आपले प्रायव्हेट पार्टस इंटीमेट वॉशने चांगले स्वच्छ करा. शरीरावरील केस शक्यतो ट्रीम करा. आंघोळ झाल्यावर हलकेसे परफ्युम लावा.

गप्पा आणि फोरप्ले – लक्षात घ्या ‘त्या’ गोष्टीची घाई करण्याधी फोरप्ले फार महत्वाचा आहे. आपल्या जोडीदाराशी विविध हलक्या विषयांवर संभाषण सुरु करा. संभाषण चालू असताना तुम्ही फोरप्लेला सुरुवात करू शकता. चुंबन, शरीराच्या विविध भागांना स्पर्श, अवयवांशी खेळणे यामुळे स्त्रिया लवकर उत्तेजित होतात.संभोगापेक्षा स्त्रियांना या गोष्टी जास्त आवडतात.

पोझिशन्स – आपला जोडीदार नेमका कोणत्या पोझिशनमध्ये कम्फर्टेबल आहे हे त्याच्याशी बोलून जाणून घ्या. शक्यतो अशाच पोझिशन पासून सुरुवात करा. काही वेळा थोड्या प्रमाणातला BDSM स्त्रियांना आवडतो. तो जर ट्राय करायचा असेल तर आधीच अशा वस्तूंची तयारी करा आणि त्याबाबत पूर्ण माहिती घ्या. (हेही वाचा: भरपूर सेक्स करूनही का राहतात स्त्रिया असंतुष्ट? कदाचित पुरुषांकडून होत असतील ‘या’ चुका)

कंडोम आणि जेल – सेक्स करण्याआधी कंडोम जरूर जवळ बाळगा. आवड असेल तर विविध फ्लेवर तुम्ही ट्राय करू शकता. शक्यतो 2 किंवा 3 कंडोम जवळ असूद्यात. अशावेळी जेल (वंगण) असणेही गरजेचे आहे. कधी कधी  गॅप घेऊन परत सेक्स करताना किंवा लिंग मोठे असेल तर किंवा जास्तवेळ लिंगाचा ताठरपणा हवा असेल तर, हे जेल उपयोगी पडते. यामुळे लिंग आणि योनी मधील घर्षण कमी होऊन दोघेही आनंद घेऊ शकतात.