आपल्या जोडीदारांप्रती अनेक लोकांची लैंगिक इच्छा (Sexual Desire ) कधीच स्थिर नसते. अनेकदा तर इतर कारणांमुळे त्यातील ओढ आणि ओलावाही कमी (Sex Drive) होत जातो. त्यामुळे नात्यांमध्ये लुप्त होत चाललेले नाविन्य, लैंगिक इच्छा कालांतराने कमी होत जाते. अशा वेळी काय कराल? जर्नल ऑफ सोशल अँड पर्सनल रिलेशनशिपच्या ऑगस्टच्या अंकात याबाबत काही प्रकाश टाकण्यात आला आहे. या अंकात गॉस एट अल.च्या लेखात त्यांनी केलेल्या अलीकडील संशोधनानुसार, याचा स्व-विस्ताराशी काहीतरी संबंध असू शकतो, असे म्हटले आहे.
सोशोधकाने म्हटले आहे की, त्याने आत्म-विस्तार सिद्धांताचा शोध घेतला. यात आढळून आले की, लोकांना वाढण्यास जन्मजात प्रवृत्त केले जाते. त्यामुळे रोमँटिक नातेसंबंध हा एक प्राथमिक मार्ग आहे असे त्यांना वाटते. ज्यामुळे लोक त्यांच्या आत्म्याबद्दलची (स्वत:बद्दलची) भावना वाढवतात. जवळीकता आणि नात्यातील ओलावा ठेवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. (हेही वाचा, Sex Drive & Libido: तुमची कामवासना अर्थातच सेक्स करण्याची इच्छा कमी करू शकतात ही 7 औषधे; घ्या जाणून)
जोडीदारासोबत लैंगिक संबंध चांगले राहण्यासाठी काय कराल?
- तुमच्या जोडीदाराशी सातत्याने संपर्कात राहा. त्याच्या स्वभाववैशिष्ट्य आणि विवीध पैलूंचा शोध घ्या.
- रोमान्स दरम्यान आणि इतर वेळीही तुमच्या जोडीदाराकडून तुम्ही काही नव्या गोष्टी शिकत आहात असे त्याला/तिला सत जाणवून द्या.
- जोडीदारासोबत शेअर केलेले अनुभव हे आपला दृष्टीकोण आणि विचारांची कक्षाही रुंदावतात. त्यामुळे एकमेकांशी विचार, अनुभव सामायिक करत राहा.
दरम्यान, मुळात जोडीदार निवडतानाच त्याच्या आवडी-निवडी समजून घ्या. ज्यामुळे भविष्यातही त्या जुळतील. आवडीनिवडी जुळल्या तर रोमान्समध्ये एक वेगळाच ओलावा निर्माण होतो. शक्यतो नातेसंबंध बिघडत नाहीत.